एक्स्प्लोर
रेसिंगसाठी बाईक्स चोरणारे अल्पवयीन मुलं पोलिसांच्या ताब्यात
बाईक रेसिंगसाठी दुचाकी गाड्या चोरणाऱ्या एका टोळीला डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे टोळीतल्या चार जणांपैकी तिघे अल्पवयीन आहेत. ही मुलं बाईक चोरण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी पकडलं.
मुंबई : बाईक रेसिंगसाठी दुचाकी गाड्या चोरणाऱ्या एका टोळीला डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे टोळीतल्या चार जणांपैकी तिघे अल्पवयीन आहेत. ही मुलं बाईक चोरण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी पकडलं.
डोंबिवली आणि जवळपासच्या परिसरात मागील काही दिवसात बाईक चोरी होण्याचे प्रकार वाढले होते. त्यामुळे पोलीस बाईकचोरांवर पाळत ठेवून होते. त्यातच मानपाडा पोलीस हे सोनारपाडा परिसरात नाईट पेट्रोलिंग करत असताना दोन दुचाकींवर चार जण संशयास्पदरित्या फिरताना त्यांना दिसले.
या चौघांना हटकलं असता ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी कसून या मुलांची चौकशी केली असता बाईक चोरण्याच्या उद्देशानं फिरत असल्याची कबूली त्यांनी दिली. त्यांच्याकडून सात चोरलेल्या दुचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
या चौघांपैकी तीन जण हे अल्पवयीन असून त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. तर एकाला पोलिसांनी अटक केली आहे. या सर्व गाड्या ते बाईक रेसिंगसाठी वापरत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
भारत
शेत-शिवार
क्राईम
Advertisement