एक्स्प्लोर

परभणीत शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना टिकटॉकचे धडे, पालक आणि गावकऱ्यांकडून शाळेला टाळं

परभणीतल्या धारखेड गावातील जिल्हा परिषद शाळेत टिकटॉक शिकवणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी गावकरी आणि पालकांनी केली आहे. यासाठी संतप्त गावकरी आणि पालकांनी शाळेला कुलुप लावलं आहे.

परभणी : टिकटॉक अॅपचं वेड तरुण वर्गात मोठ्या प्रमाणावर आहे, याची अनेक उदाहरणं तुम्ही पाहिली असतील. मात्र परभणीतील एका जिल्हा परिषद शाळेत शिक्षक दाम्पत्याने शाळेतील विद्यार्थ्यांनाच टिकटॉकचे धडे देण्यास सुरुवात केली आहे. टिकटॉक व्हिडीओ तयार केले नाही तर हे शिक्षक विद्यार्थ्यांना चक्क वर्गाबाहेर उभं करत होते. मात्र शिक्षक दाम्पत्याच्या या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्यांनी याबाबत पालकांकडे तक्रार केली. त्यानंतर संतप्त गावकऱ्यांनी आणि पालकांनी या शिक्षकांवर कारवाई व्हावी यासाठी शाळेलाच कुलूप ठोकलं आहे.

गोदाकाठेवर वसलेल्या धारखेड गावातील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिले ते आठवीचे वर्ग आहेत. याच गावातील एकूण 160 विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतात. शाळेतील शेख इमाम व शेख नजमा हे पती-पत्नी शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवण्याऐवजी वेगवेगळे व्हिडीओ दाखवणे, टिकटॉकचे व्हिडीओ जास्त प्रमाणात दाखवून त्यांच्याकडून त्याच प्रमाणे व्हिडीओ बनवून घेत होते. जर विद्यार्थ्यांनी व्हिडीओ बनवण्यास विरोध केला किंवा नकार दिल्यास विद्यार्थ्यांना दोन-दोन तास वर्गाबाहेर उभे करत होते.

शिवाय दुसऱ्या शिक्षकांबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात व्द्वेष निर्माण करण्याचं काम या शिक्षक दाम्पत्याकडून सुरु होतं. महत्वाचे म्हणजे कुणी तक्रार केल्यास आपले नातेवाईक पोलीस उपनिरिक्षक असल्याचं सांगून गुन्हा दाखल करण्याची धमकी त्यांना देत असत. शिक्षकांच्या या वागणुकीमुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत आहे. याबाबत वारंवार तक्रार करुन ही शिक्षण विभागाकडून कारवाई करण्यात न आल्याने गावकरी आणि पालकांनी एकत्र येऊन शाळेला टाळं ठोकलं आहे. जोपर्यंत या संबंधित शिक्षकांवर कारवाई होणार नाही. तोपर्यंत टाळं उघडणार नसल्याचा पवित्रा या पालक आणि गावकऱ्यांनी घेतला आहे.

या टिकटॉक प्रकरणाची शिक्षण विभागानंही दखल घेतली असून, चौकशी करुन कारवाई करण्याचं आश्वासन शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलं आहे. शिक्षण विभाग या टिकटॉकच्या प्रेमात पडलेल्या शिक्षकांवर कारवाई करणार का हे पाहावं लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही

व्हिडीओ

Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
Embed widget