एक्स्प्लोर

तीन दिवसात कर्जमाफीबाबत निर्णय घ्या, अन्यथा... : अजित पवार

पनवेल : राज्य सरकारने कर्जमाफीबाबतचा निर्णय येत्या तीन दिवसात घ्यावा, अन्यथा विशेष अधिवेशन बोलवावं, आम्ही यायला तयार आहोत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली आहे. पनवेलमध्ये संघर्षयात्रेची सांगता केल्यानंतर अजित पवार बोलत होते. उत्तर प्रदेशच्या सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. राज्यातही कर्जमाफी व्हावी, यासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. यूपीए सरकारने 71 हजार कोटींचं देशभरातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं होतं. त्याच प्रमाणे एनडीए सरकारनेही निर्णय घ्यावा. पैसा राज्यातून उभा करायचा की केंद्रातून हा त्यांचा प्रश्न आहे, पण कर्जमाफीबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी अजित पवार यांनी केली. तीन दिवसात कर्जमाफीबाबत निर्णय घ्या अन्यथा विशेष अधिवेशन बोलवा. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आम्ही तयार आहोत. शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, याबाबत विशेष अधिवेशनात चर्चा व्हावी, असंही अजित पवार म्हणाले. ...तर शेतकरीच फडणवीस सरकारला इंगा दाखवेल : शरद पवार कर्जमाफी मागण्याची इच्छा शेतकऱ्यांची नसते, शेतकरी घेतलेले कर्ज परत करण्यासाठी धडपडत असतो. मात्र, आज त्याच्या पिकाला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलेला कर्जमाफीचा शब्द पाळा. टिंगल उडवू नका. अन्यथा शेतकरी सरकारला इंगा दाखवले, असा घणाघात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. विरोधकांच्या संघर्ष यात्रेचा आज रायगड जिल्ह्यातील पनवेलमध्ये समारोप झाला. यावेळी शरद पवार यांनी उपस्थितांशी संवाद साधला. मनमोहन सरकारला शक्य, मग मोदी सरकारला का नाही? “मी कृषीमंत्री असताना त्यावेळी आत्महत्येची माहिती ऐकल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह अस्वस्थ झाले. वर्धा, यवतमाळमध्ये ज्यांनी आत्महत्या केली, त्यांच्या कुटुंबीयांची आम्ही दोघांनी भेट घेतली. त्यानंतर अर्थमंत्र्यांनी तयारी दाखवली आणि 71 हजार कोटींचं कर्ज एकमताने माफ केलं. मग मनमोहन सिहांचं सरकार करु शकतं, तर मोदी सरकार का नाही?” असा सवाल शरद पवार यांनी केंद्र सरकारला विचारला.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Tukaram Mundhe On Majha Katta :  सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सावधान! राज्यात पावसाचा जोर वाढणार, पुढील पाच दिवस कसं असणार हवामान? कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?
सावधान! राज्यात पावसाचा जोर वाढणार, पुढील पाच दिवस कसं असणार हवामान? कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?
नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन! मुंबईसह राज्यात विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या, आदित्य ठाकरेंचं  पोलीस महासंचालकांना पत्र
नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन! मुंबईसह राज्यात विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या, आदित्य ठाकरेंचं  पोलीस महासंचालकांना पत्र

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget