एक्स्प्लोर
Advertisement
गडचिरोलीत भीषण अपघात, दोन लहान बाळांसह सात जणांचा मृत्यू
या अपघातात बलेनोमध्ये असणाऱ्या चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर जिमलगट्टा प्राथमिक उपकेंद्रात दाखल केल्यानंतर काळी पिवळीमधील वाहन चालक आणि बलेनो वाहनातील दोन लहान बाळंही दगावले.
गडचिरोली : सुझुकी बलेनो आणि काळी पिवळी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अपघात एवढा भीषण होता, की चार जणांचा जागीच मृत्यू झाला.
जिमलगट्टापासून तीन किमी अंतरावर असलेल्या गोविंदगावाजवळ आज सकाळी 9.30 च्या दरम्यान काळी पिवळी वाहनात घरघुती सामान नेण्यात येत होतं. यावेळी चंद्रपूर पासिंग वाहन सुझुकी बलेनो आणि काळी पिवळी यामध्ये जोरदार धडक झाली.
या अपघातात बलेनोमध्ये असणाऱ्या चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर जिमलगट्टा प्राथमिक उपकेंद्रात दाखल केल्यानंतर काळी पिवळीमधील वाहन चालक आणि बलेनो वाहनातील दोन लहान बाळंही दगावले.
चंद्रपूर येथील बंगाली कॅम्प येथील बलेनोमध्ये प्रवास करत असलेलं मोहुर्ले कुटुंब असल्याचं सांगण्यात येत आहे. या अपघातात बलेनो वाहन क्रमांक एम एच 34 बीएफ 4861 चा समावेश आहे. तर काळी पिवळी वाहन क्रमांक एम एच 34 – 0791 आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement