एक्स्प्लोर
अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू, अत्याचार करुन खून झाल्याचा संशय
दरम्यान या मुलीवर अत्याचार करुन तिचा खून केल्याचा संशय व्यक्त होत आहे. मात्र पोस्टमॉर्टम नंतर या मुलीच्या मृत्यू कसा झाला असावा याचा अधिक खुलासा होण्याची शक्यता आहे.

चंद्रपूर : एका अल्पवयीन वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूरातील नागभीड तालुक्यातील पारडी (ठवरे) गावात घडली आहे. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास दोन तरुण या अल्पवयीन मुलीला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी घेऊन आले. उपचारासाठी आणलेल्या या मुलीचा अपघात झाल्याची माहिती या दोघांनी रुग्णालय प्रशासनला दिली. डॉक्टरांनी अल्पवयीन मुलीला तपासल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले. दरम्यान या मुलीवर अत्याचार करुन तिचा खून केल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोस्टमॉर्टम नंतर या मुलीच्या मृत्यू कसा झाला असावा याचा अधिक खुलासा होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तसेच पोलीस पुढील तपास करत आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
व्यापार-उद्योग
क्रिकेट























