मुंबई - विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून सव्वीस दिवस होते आले तरी राज्यात अजूनही कोणाचीच सत्ता आलेली नाही. त्यासाठी ज्या हालचाली सुरू आहेत, त्यातूनही काही निष्पन्न होताना दिसत नाहीये. त्यामुळे नवं सरकार कधी येणार याबाबत राजकीय पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. यापूर्वीही सरकार स्थापन करायला बराच कालावधी गेल्याचे दाखले आता सत्ता स्थापनेच्या हालचाली करणाऱ्या पक्षांच्या नेत्यांकडून दिले जात आहेत.

राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबरला लागला. या निकालानंतर राज्यात पुन्हा युतीचे सरकार येईल अशी चर्चा होती. पण मुख्यमंत्री पदावरुन शिवसेनेनं भाजपशी फारकत घेतली आणि राज्यात महाशिवआघाडीचे सरकार बनण्याबाबत हालचालींना सुरुवात झाली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होऊन त्यात किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार झाल्याचं या पक्षांच्या नेत्यांनी जाहीरही केलं. मात्र, सत्ता स्थापनेबाबत चर्चाच झाली नसल्याचं, तसंच किमान समान कार्यक्रमाबाबतही चर्चा झाली नसल्याचं शरद पवारांनी दिल्लीत जाहीर केलं आणि राज्यात गोंधळाचं वातावरण तयार झालं.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील बैठकीचे सत्र सुरु होऊन आता एक आठवड्यातून अधिकच काळ गेला आहे. निकालानंतर आता 26 दिवस झाले, म्हणजेच महिना पूर्ण होत आला तरी राज्याला नवं सरकार मिळालेलं नाही. यापूर्वी 1999 साली काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वेगळी निवडणूक लढवली होती. त्यानंतर या दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापन करण्यासाठी एकत्र येण्याचं ठरवलं. त्यांच्या सत्ता स्थापनेच्या चर्चेला तेव्हा तब्बल दीड महिना लागला होता. याचेच उदाहरण या पक्षांचे नेते आता देत आहेत.

काय होती 1999 सालची परिस्थिती?
1999 मध्ये शिवसेनाल 69, भाजपला 56 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेस 75 जागा आणि राष्ट्रवादी 58 जागा मिळाल्या होत्या. भाजपतर्फे गोपीनाथ मुंडे यांचा मुख्यमंत्री पदाचा आग्रह होता. तेव्हा नुकताच शरद पवार यांनी सोनिया गांधी यांचा विदेशी जन्माचा मुद्दा घेत काँग्रेस सोडून राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली होती. भाजप आणि सेनेतील मुख्यमंत्री पदावरुन वाद सुरु असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. राष्ट्रवादीची स्थापना काँग्रेस फुटून झाल्यामुळे होती, त्यामुळे हे पक्ष एकत्र येतील अशी शंका भाजप आणि सेनेला नव्हती. पण हे पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थान झाली.

महाशिवआघाडीतील चर्चेबाबत कुणीही कुठल्याही पक्षाचे नेते आता स्पष्ट भूमिका मांडताना दिसत नाहीत. किंबहुना आघाडीच्या नेत्यांच्या वक्तव्यामुळे गोंधळात भर पडत आहे. पत्रकारांना जी माहिती दिली जातेय ती संभ्रम वाढवेल अशीच आहेत. त्यामुळे या तीनही पक्षांच्या कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आमदारही सध्या टेन्शनमध्ये आहेत. खरंच सरकार होणार का? कुणाचं सरकार होणार हीच चर्चा राज्यात रंगली आहे.

संबंधित बातम्या -

शरद पवार समजून घ्यायला 100 जन्म घ्यावे लागतील : संजय राऊत

सत्ता स्थापनेबाबत चर्चा नाही, आघाडीतील मित्रपक्षांना नाराज करु शकत नाही : शरद पवार

शिवसेना आणि भाजपला विचारा सरकार कसं बनवणार? : शरद पवार

व्हिडीओ :