एक्स्प्लोर

शिर्डीत मानवी तस्करी, अवयव चोरी रॅकेटचा संशय; महिला बेपत्ताप्रकरणी पोलीस महासंचालकांना तपासाचे आदेश

इंदूर येथील दीप्ती सोनी 10 ऑगस्ट 2017 ला शिर्डीतून बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून योग्य तपास होत नसल्याने दीप्ती यांचे पती मनोज सोनी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली हो

शिर्डी : मध्य प्रदेशमधील इंदोर येथील दीप्ती सोनी शिर्डीतून बेपत्ताप्रकरणी औरंगाबाद उच्च न्यायालयाने शिर्डी पोलीस आणि अहमदनगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केलेल्या तपासाबाबत स्पष्ट शब्दांत तीव्र नापसंती व्यक्त करत फटकारले आहे. शिर्डीत गेल्या चार वर्षांत अनेक जण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी असून येथे मानवी तस्करी अथवा अवयव चोरीचे रॅकेट कार्यरत आहे का? याचा तपास राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी करावा असा आदेशही न्यायालयाने दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. एबीपी माझाने 2019 मध्ये डिसेंबर महिन्यात याबाबत वृत्त प्रसारित केलं होतं. इंदूर येथील दीप्ती सोनी 10 ऑगस्ट 2017 ला शिर्डीतून बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून योग्य तपास होत नसल्याने दीप्ती यांचे पती मनोज सोनी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. संपूर्ण तपासाचा अहवाल शिर्डी पोलिसांकडून औरंगाबाद उच्च न्यायालयात सादर झाल्यानंतर 220 पाणी अहवाल निरर्थक ठरवला आहे. कोर्टाने यापूर्वी सलग दोनदा मानवी तस्करी किंवा अवयव चोरीच्या अंगाने तपास करण्याच्या स्पष्ट सूचना पोलीस अधीक्षकांना दिल्यानंतरही तसा तपास केल्याचा चकार शब्दही अहवालात नाही. मात्र पोलिसांनी याबाबत बोलताना स्पष्ट केले आहे की, मानवी तस्करी याबाबत कोणतेही पुरावे अथवा तक्रार आजपर्यंत जिल्ह्यात दाखल नसून पुन्हा एकदा नव्याने या बेपत्ता प्रकरणी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी अतिशय निष्काळजीपणे या गंभीर प्रकरणाचा तपास केल्याचे ताशेरे कोर्टाने ओढले आहेत. पोलिसांनी हायकोर्टात दिलेली शिर्डीतून बेपत्ता व्यक्तींची आकडेवारी 2017- 71 बेपत्ता- 20 तपास बाकी 2018- 82 बेपत्ता- 13 तपास बाकी 2019- 88 बेपत्ता- 14 तपास बाकी 2020- 38 बेपत्ता- 20 तपास बाकी शिर्डीत दररोज लाखो साईभक्त दर्शनासाठी येतात त्यात बेपत्ता होण्याचं प्रमाण सुद्धा असून बेपत्ता महिलांमध्ये विवाहित महिला व मुलींचे मोठे प्रमाण असून हे बहुतेक सर्व महाराष्ट्राबाहेरील आहेत. दर्शनासाठी शिर्डीत आल्यानंतर बेपत्ता झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. मात्र अनेकांचा शोध सुद्धा लागला आहे. त्यामुळे आता पोलीस तपासात काय निष्पन्न होणार हे पाहणं महत्वाचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget