Sushma Andhare: माझा घातपात होऊ शकतो, सुषमा अंधारेंनी व्यक्त केली भीती
Sushma Andhare Chandrapur : घात अपघातात होऊ शकतो अशी काळजी अनेकांनी वर्तवली, काहीही होऊ शकतं!
Sushma Andhare Latest News Update : माझा घात-अपघात होऊ शकतो, अशी भीती शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली आहे. तुमच्या मागे चौकशी लावण्यासारखं काही नसल्याने तुमचा अपघात (Sushma Andhare life threat ) होऊ शकतो, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळाल्याचं सांगत सुषमा अंधारे यांनी गौप्यस्फोट केला. चंद्रपूर शहरातील प्रियदर्शनी सभागृहात सुषमा अंधारे यांनी व्याख्यान देत होत्या. त्यावेळी आपल्याला अधिकाऱ्यानं तुमचा घात-अपघात होऊ शकतो, असं सांगितल्याचं त्या म्हणाल्या. महापुरुषांच्या स्वप्नातील भारत या विषयावर सुषमा अंधारे यांचं व्याख्यान होते. चंद्रपुरातील (Chandrapur ) काही सामाजिक संघटनांनी एकत्र येत या व्याख्यानाचे आयोजन केले होते. (Sushma Andhare life threat )
या वेळी बोलताना त्यांनी महापुरुषांवर सुरू असलेल्या राजकारणावर प्रखर भाष्य केले. वर्तमान सरकार महापुरुषांच्या यादीत काही लोकांना घुसवण्याचं काम करतंय असा त्यांनी आरोप केला. महापुरुषांची अवमानना होते मात्र सरकारी यंत्रणा काहीही करत नाही, ठप्प राहते आणि हे जाणीव पूर्वक केलं जातं. जाणीवपूर्वक महापुरुषांचं प्रतिमा भंजन केलं जातं आहे. सरकारला बहुजनांच्या आणि पुरोगामी विचारांच्या महापुरुषांची ओळख पुसून टाकायची आहे आणि हेडगेवार-गोळवलकर यांना लोकांच्या मनात ठसवायचं आहे असा घणाघात त्यांनी केला. मात्र त्यांनी अवमानना करणाऱ्या नेत्यांवर शाई फेकण्याला पूर्णपणे विरोध केला. ही शाई नेत्यांच्या तोंडावर फेकण्यापेक्षा ती गोळा करा, निवडणूकीत बोटावर लावा आणि अशा लोकांना निवडणूकीत पराभूत करा असं आवाहन सुषमा अंधारे यांनी यावेळी केलं.
उर्फी जावेदच्या कपड्यावर तीन तीन दिवस चर्चा होते पण...
या वेळी त्यांनी लोकांना जाणीवपूर्वक खऱ्या मुद्द्यांपासून लांब नेलं जात असल्याचे सांगितले. लोकांच्या बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार या मुद्द्यांना बगल दिली जात आहे. उर्फी जावेदच्या कपड्यांवर 3-3 दिवस चर्चा होते, मात्र बायकांचे कपडे उतरवणाऱ्यांची चर्चा होत नाही. धर्मरक्षक की स्वराज्य रक्षक या सारखे मुद्दे उपस्थित करून लोकांचं ब्रेनवॉश केलं जातं आहे, अदानी आणि अंबानी यांनी दिलेला दीड जीबी डाटा लोकांना नको त्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवतो, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
पाहा व्हिडीओ, नेमकं काय म्हणाल्या सुषमा अंधारे..?
आणखी वाचा:
Job Majha : महावितरण आणि परभणी महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, 'असा' करा अर्ज
विद्यापीठं अन् महाविद्यालयांच्या परीक्षासंदर्भात महत्वाची बातमी...