एक्स्प्लोर

Sushma Andhare: सुषमा अंधारेंच्या अडचणी वाढणार, विश्व वारकरी संघ राज्यभर गुन्हे दाखल करणार

वारकरी संतांच्याबाबत (Warkari Sant) शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अडचणी वाढल्या आहेत.

Sushma Andhare News : वारकरी संतांच्याबाबत (Warkari Sant) शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अडचणी वाढल्या आहेत. अंधारे यांनी माफी मागितल्यानंतरही वारकरी संप्रदाय शांत होण्यास तयार नसून आता राज्यभर सुषमा अंधारे यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची तयारी विश्व वारकरी संघाने सुरु केल्याचे अध्यक्ष जगन्नाथ महाराज देशमुख यांनी जाहीर केले आहे.

वारकरी संतांच्याबाबत वक्तव्यानंतर काल सुषमा अंधारे यांनी माफी मागितली असली तरी यावर वारकरी संप्रदायाचे समाधान झालेले नसून त्यांचे विरोधात राज्य सरकारने गुन्हा दाखल करण्याची मागणी विश्व वारकरी संघाच्या तुकाराम चौरे महाराज यांनी केली आहे. 

महानुभाव संप्रदायात देखील संतापाची लाट

सुषमा अंधारे यांनी भगवान श्रीकृष्णा विषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने महानुभाव संप्रदायात देखील संतापाची लाट असून अंधारे ज्या पक्षात आहेत, त्या पक्षाला मतदान न करण्याची शपथ भगवान श्रीकृष्णासमोर घेण्याची मोहीम गावोगावी राबवली जाणार आहे. याची सुरुवात औरंगाबाद येथील महानुभाव आश्रमातून झाली आहे. 

वारकरी संप्रदायाचा राजकारणाशी कोणताही संबंध नसून राजकीय नेत्यांनी वारकरी संप्रदायातील संतांवर अशा पद्धतीची वक्तव्ये केली तर त्याची किंमत त्यांना भोगावी लागेल असा इशारा विश्व वारकरी संघाचे अध्यक्ष जगन्नाथ महाराज यांनी दिला आहे. राज्यातील 36 जिल्हे आणि 270 तालुक्यात पसरलेल्या या संघटनेने आपल्या गावोगावच्या पदाधिकाऱ्यांना सुषमा अंधारे यांच्या विरोधात तक्रार देण्याच्या सूचना दिल्याचे जगन्नाथ महाराज देशमुख यांनी सांगितले.

कडक कायदा करण्याची मागणी 

दरम्यान वारकरी संत आणि थोर महापुरुषांच्याबाबत वारंवार अपमानजनक वक्तव्ये येत असताना राज्य शासनाने याच्या विरोधात कडक कायदा करण्याची मागणी वारकरी फडकरी दिंडी समाज संघटनेचे ज्ञानेश्वर जळगावकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. सुषमा अंधारे यांच्या वक्तव्यावर आता महिला कीर्तनकार देखील आक्रमक भूमिका घेऊ लागल्या असून हिंदू देवदेवता आणि वारकरी संतांच्या अपमाना नंतर शांत कसे राहायचे असा सवाल महिला कीर्तनकार सुनीताताई आंधळे यांनी घेतली आहे. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे वारकरी संप्रदायाची नेहमीच आधार आणि आदरयुक्त होते मात्र आता हिंदू आणि वारकरी संप्रदायाच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या अशा विकृती उद्धव ठाकरे यांनी  पटकन पक्षातून काढून टाकाव्यात अशी भूमिका आंधळे यांनी घेतली आहे.  सुषमा अंधारे यांची भूमिका हिंदुत्ववादी शिवसेनेत आता अडचणीच्या ठरू लागल्याने शिवसेना आणि अंधारे यांच्या समोरच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. वारकरी संप्रदाय हा सर्व जाती धर्म आणि राजकीय पक्षाला सामावून घेणारा असताना त्यांच्यावर भाजपचा शिक्का मारण्याचा अंधारे यांचा प्रयत्न त्यांनाच अडचणीत आणणारा ठरू लागला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray Podcast : हीच क्रांतीची वेळ, तुम्हाला गृहीत धरणाऱ्यांचा वचपा काढा; राज ठाकरेंची गर्जना, म्हणाले, माझं स्वप्न साकारण्यासाठी...
हीच क्रांतीची वेळ, तुम्हाला गृहीत धरणाऱ्यांचा वचपा काढा; राज ठाकरेंची गर्जना, म्हणाले, माझं स्वप्न साकारण्यासाठी...
Mohan Bhagwat: बांग्लादेशातील हिंसा, अत्याचारावर मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'दुबळं असणं हा अपराध, हिंदूंनी...'
बांग्लादेशातील हिंसा, अत्याचारावर मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'दुबळं असणं हा अपराध, हिंदूंनी...'
Rain Update: राज्यात पुन्हा परतीच्या पावसाचा अंदाज; जवळपास 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज
राज्यात पुन्हा परतीच्या पावसाचा अंदाज; जवळपास 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज
नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये दोन अग्निवीरांचा मृत्यू, आर्मी कमांडरांनी घेतला मोठा निर्णय
नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये दोन अग्निवीरांचा मृत्यू, आर्मी कमांडरांनी घेतला मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narayangad Beed : मनोज जरांगेंचा दसरा मेळावा नारायणगडावर; जय्यत तयारी सुरूABP Majha Headlines :  9 AM : 12 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सShivaji Park - Azad Maidan : शिवाजी पार्क आणि आझाद मैदानावर दसरा मेळाव्याची जय्यत तयारीTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 12 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray Podcast : हीच क्रांतीची वेळ, तुम्हाला गृहीत धरणाऱ्यांचा वचपा काढा; राज ठाकरेंची गर्जना, म्हणाले, माझं स्वप्न साकारण्यासाठी...
हीच क्रांतीची वेळ, तुम्हाला गृहीत धरणाऱ्यांचा वचपा काढा; राज ठाकरेंची गर्जना, म्हणाले, माझं स्वप्न साकारण्यासाठी...
Mohan Bhagwat: बांग्लादेशातील हिंसा, अत्याचारावर मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'दुबळं असणं हा अपराध, हिंदूंनी...'
बांग्लादेशातील हिंसा, अत्याचारावर मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'दुबळं असणं हा अपराध, हिंदूंनी...'
Rain Update: राज्यात पुन्हा परतीच्या पावसाचा अंदाज; जवळपास 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज
राज्यात पुन्हा परतीच्या पावसाचा अंदाज; जवळपास 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज
नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये दोन अग्निवीरांचा मृत्यू, आर्मी कमांडरांनी घेतला मोठा निर्णय
नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये दोन अग्निवीरांचा मृत्यू, आर्मी कमांडरांनी घेतला मोठा निर्णय
Dasara Melava 2024: 900 एकरवर सभा, 500 क्विंटल बुंदीचा महाप्रसाद, मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याकडे राज्याचं लक्ष; काय भूमिका घेणार?
900 एकरवर सभा, 500 क्विंटल बुंदीचा महाप्रसाद, मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याकडे राज्याचं लक्ष; काय भूमिका घेणार?
गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
Navneet Rana: नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
Embed widget