एक्स्प्लोर

...तर अजितदादांबद्दल मलाही बरंच काही बोलता येईल : धस

अजित पवार यांनी वैयक्तिक पातळीवर टीका केल्याने धसही प्रचंड संतापले असून, अजित पवारांना त्याच भाषेत उत्तर देण्याचा इशारा दिला आहे.

बीड : माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी केलेल्या सुरेश धस यांच्यावर टीका केली. या टीकेला सुरेश धस यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. विशेष म्हणजे, अजित पवार यांनी वैयक्तिक पातळीवर टीका केल्याने धसही प्रचंड संतापले असून, अजित पवारांना त्याच भाषेत उत्तर देण्याचा इशारा दिला आहे. अजित पवार काय म्हणाले होते? “एखाद्याला संधी दिल्यानंतर त्या संधीचं सोनं करायचं की त्याची राख करायची, हे ज्याच्या-त्याच्या हातामध्ये असतं. जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी काम करतोय, तोपर्यंत या गद्दारांना राष्ट्रवादीत प्रवेश नाही. काय काय माणसं वेळ पडली तर पाय धरतात, डोळ्यात पाणी आणतात. ज्यांनी स्वत:च्या पहिलीला सोडलं नाही, ते इतरांना काय सोडणार? तुमच्या मनात जे आहे, ते माझ्या मनात आहे.”, असे म्हणत अजित पवारांनी सुरेश धस यांचं नाव न घेता टीका केली. सुरेश धस यांन अजित पवारांना काय उत्तर दिले? “आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पहावं वाकून. किमान अजितदादांनी तरी अशी वाक्य वापरु नयेत. त्यांच्याबद्दल मलाही बरंच काही बोलता येईल. परंतु, अजूनही मी बोललेलो नाही. कदाचित, उद्या-परवापासून बोलायला सुरुवात करेन.”, असा शब्दात सुरेश धस यांनी अजित पवारांच्या टीकेला उत्तर देत इशाराही दिला आहे. आता अजित पवार आणि सुरेश धस यांच्यातील टीकेचं हे युद्ध कुठवर पोहोचतंय, हे पाहणं महत्वाचं ठरेल. पाहा व्हिडीओ :

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur News: प्रतिभा धानोरकर अन् विजय वडेट्टीवारांच्या ऐक्याला दिवाळीपूर्वीच फटाके! चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी पुन्हा राजेश अडूर यांची वर्णी
प्रतिभा धानोरकर अन् विजय वडेट्टीवारांच्या ऐक्याला दिवाळीपूर्वीच फटाके! चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी पुन्हा राजेश अडूर यांची वर्णी
Raju Shetti Protest Sugarcane Farmers: 61 तासांनी राजू शेट्टींचं चक्काजाम आंदोलन स्थगित; 3900+100+200 रुपयांचा ठरला फॉर्म्युला, किणी टोलनाक्यावर घोषणा
61 तासांनी राजू शेट्टींचं चक्काजाम आंदोलन स्थगित; 3900+100+200 रुपयांचा ठरला फॉर्म्युला, किणी टोलनाक्यावर घोषणा
लबाड लांडगा ते गाढव कुत्रा! प्राण्यांची उपमा देत राजकीय नेत्यांची ऐकमेकांवर टीका, सोलापूरचं राजकारण तापलं 
लबाड लांडगा ते गाढव कुत्रा! प्राण्यांची उपमा देत राजकीय नेत्यांची ऐकमेकांवर टीका, सोलापूरचं राजकारण तापलं 
Abp Majha Impact : ABP माझाच्या बातमीचा दणका! प्रशासनाला आली जाग, तब्बल 3 महिन्यानंतर मालंवडी गावाला मिळालं हक्काचं पाणी
Abp Majha Impact : ABP माझाच्या बातमीचा दणका! प्रशासनाला आली जाग, तब्बल 3 महिन्यानंतर मालंवडी गावाला मिळालं हक्काचं पाणी

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur News: प्रतिभा धानोरकर अन् विजय वडेट्टीवारांच्या ऐक्याला दिवाळीपूर्वीच फटाके! चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी पुन्हा राजेश अडूर यांची वर्णी
प्रतिभा धानोरकर अन् विजय वडेट्टीवारांच्या ऐक्याला दिवाळीपूर्वीच फटाके! चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी पुन्हा राजेश अडूर यांची वर्णी
Gokul Milk : 'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
Israel : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का, इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
BCCI :  दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयवर नामुष्की, भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यासाठी नव्या मैदानाची निवड
दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयला फटका, श्रीलंकेविरोधातील वनडे मॅच दक्षिण भारतातील शहरात होणार
Muhurat Trading 2026: दिवाळीनिमित्त रविवारी NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
दिवाळीनिमित्त NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
Kolhapur Protest : मुंबईहून आलेल्या मुश्रीफांनी नवा फॉर्म्युला दिला अन् ऊसदरांची बैठक फिस्कटली; कारखानदार आडमुठे असतील तर... राजू शेट्टींचा इशारा, 4200 दरांवर तोडग्यास तयार
मुंबईहून आलेल्या मुश्रीफांनी नवा फॉर्म्युला दिला अन् ऊसदरांची बैठक फिस्कटली; कारखानदार आडमुठे असतील तर... राजू शेट्टींचा इशारा, 4200 दरांवर तोडग्यास तयार
LIC Results : एलआयसीच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत तुफान तेजी, निव्वळ नफा 12076 कोटींवर, शेअर किती रुपयांवर?
एलआयसीच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत तुफान तेजी, निव्वळ नफा 12076 कोटींवर, शेअर किती रुपयांवर?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
Embed widget