एक्स्प्लोर

पवार साहेबांनी तातडीने धनंजय मुंडेंच्या हातात नारळ द्यावा : सुरेश धस

कोर्टाने परळीतील संत जगमित्र सूतगिरणीच्या तीन कोटींच्या कर्ज वसुलीसाठी धनंजय मुंडे यांच्यासह इतर आठ जणांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. यापुढे या मालमत्तेची विक्री अथवा व्यवहार करता येणार नाही.

अहमदनगर : राज्यभर गाजलेल्या बीड जिल्हा सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाने विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना दणका दिला. परळीतील संत जगमित्र सूतगिरणीच्या तीन कोटींच्या कर्ज वसुलीसाठी धनंजय मुंडे यांच्यासह इतर आठ जणांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. यापुढे या मालमत्तेची विक्री अथवा व्यवहार करता येणार नाही. कोर्टाच्या या निर्णयानंतर विधानपरिषदेचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे. विरोधी पक्ष नेते या घटनात्मक पदावर असलेल्या धनंजय मुंडे यांनी तत्काळ या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. शरद पवार साहेब शेतकऱ्यांचे कैवारी म्हटले जातात, त्यामुळे तातडीने पवार साहेबांनी त्यांच्या (धनंजय मुंडे) हातात नारळ द्यावा, अशी मागणी सुरेश धस यांनी केली. दरम्यान, गृहमंत्र्यांच्या आदेशाने पोलिसांनी सूडबुद्धीने न्यायालयात अहवाल सादर केला, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. यावरही सुरेश धस यांनी भाष्य केलं. ''काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार असतानाच गुन्हे दाखल झाले आहेत. तेव्हाच्या आणि आताच्या गृहमंत्र्यांचा त्याच्याशी संबंध नाही. कोर्टाने एसआयटी नेमून त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत,'' असं सुरेश धस म्हणाले. ''गुन्हे दाखल झाल्याचं वाईट वाटतं तर शेतकऱ्यांचे पैसे देऊन टाका. जिल्हा बँकेचा ठेवीदार हा गोरगरीब आहे. हे पैसे न मिळाल्यामुळे अनेकांचे आई-वडील देवाघरी गेले, अनेकांच्या मुलामुलींचे लग्न मोडले. खोटं बोल पण रेटून बोल याचंही थोडं भान विरोधी पक्षाने ठेवलं पाहिजे,'' असं सुरेश धस म्हणाले. काय आहे प्रकरण? बीड जिल्हा सहकारी बँक घोटाळ्याची अनेक वर्षांपासून प्रलंबित न्यायालयीन प्रक्रिया अखेर सुरु झाली आहे. या गैरव्यवहाराप्रकरणी सत्र न्यायालयाने कडक ताशेरे ओढले आहेत. तीन कोटी रुपयांच्या वसुलीसाठी धनंजय मुंडे यांचं घर, सूतगिरणीचं कार्यालय आणि विविध ठिकाणी असलेल्या मालमत्तेचे यापुढे व्यवहार करता येणार नाही तसंच त्यातून लाभ घेता येणार नाही, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. या गैरव्यवहारप्रकरणी धनंजय मुंडे यांची देशमुख टाकळी, कौडगाव, जलालपूर इथल्या शेतजमिनीसह परळीच्या अंबाजोगाई रोडवरील घर, संत जगमित्र सूतगिरणीच्या ऑफिसच्या विक्रीवर बंदी घालण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे. बीड जिल्हा सहकारी बँकेकडून संत जगमित्र सहकारी सूतगिरणीला कर्ज देताना अनेक नियमांचं उल्लंघन करण्यात आलं. यानंतर बेकायदेशीर कर्ज वितरण प्रकरणी 2 ऑक्टोबर 2013 रोजी परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी विशेष तपास पथकाने तीन वर्षांनंतर 11 जुलै 2016 रोजी दोषारोप पत्र परळी न्यायालयात दाखल केलं होतं. या दोषारोप पत्रात बँकेच्या तत्कालीन संचालकांसह विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार अमरसिंह पंडित, सुभाष सारडा, राजाभाऊ मुंडे, धैर्यशील साळुंके यांचा समावेश आहे. गेल्या तीन वर्षांपासून या प्रकरणी न्याय मिळण्याकडे ठेवीदार शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. संबंधित बातम्या :
गृहमंत्र्यांच्या आदेशाने सूडबुद्धीने न्यायालयात अहवाल सादर : धनंजय मुंडे
बीड जिल्हा सहकारी बँक घोटाळा : धनंजय मुंडेंच्या संपत्तीवर निर्बंध
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pakistan vs Afghanistan War : तालिबानचा पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक! दोन्ही देशांची सीमारेषा असलेल्या ड्युरंड लाईनवर युद्धसदृश परिस्थिती
तालिबानचा पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक! दोन्ही देशांची सीमारेषा असलेल्या ड्युरंड लाईनवर युद्धसदृश परिस्थिती
Kirit Somaiya : मालेगावमध्ये बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचा कारखाना; किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावा
मालेगावमध्ये बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचा कारखाना; किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावा
गावातील 125 लोकांनी स्टॅम्प पेपरवर लिहून दिलंय, पण मला तिथं 60 मतं; कोर्ट बदमाश, तरीही कोर्टात जाणार, बच्चू कडूंचा निर्धार
गावातील 125 लोकांनी स्टॅम्प पेपरवर लिहून दिलंय, पण मला तिथं 60 मतं; कोर्ट बदमाश, तरीही कोर्टात जाणार, बच्चू कडूंचा निर्धार
Deepak Kesarkar On Dhananjay Munde : वाल्मिक कराडला 100% अटक होणार,शंका बाळगू नका
Deepak Kesarkar On Dhananjay Munde : वाल्मिक कराडला 100% अटक होणार,शंका बाळगू नका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bajrang Sonawane : सवंगडी काय करतात हे पाहण्यासाठी तरी अजित पवार यांनी बीडचं पालकमंत्री व्हावंPune Pub : पबकडून नव्या वर्षाच्या पार्टीला येणाऱ्यांना Condom आणि ORS च्या पाकिटांचं वाटपDeepak Kesarkar On Dhananjay Munde : वाल्मिक कराडला 100% अटक होणार,शंका बाळगू नकाSrinagar To Jammu Railway Snowfall : बर्फाची चादर,रेल्वेची सफर; श्रीनगर-जम्मू स्वर्गाची सफर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pakistan vs Afghanistan War : तालिबानचा पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक! दोन्ही देशांची सीमारेषा असलेल्या ड्युरंड लाईनवर युद्धसदृश परिस्थिती
तालिबानचा पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक! दोन्ही देशांची सीमारेषा असलेल्या ड्युरंड लाईनवर युद्धसदृश परिस्थिती
Kirit Somaiya : मालेगावमध्ये बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचा कारखाना; किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावा
मालेगावमध्ये बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचा कारखाना; किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावा
गावातील 125 लोकांनी स्टॅम्प पेपरवर लिहून दिलंय, पण मला तिथं 60 मतं; कोर्ट बदमाश, तरीही कोर्टात जाणार, बच्चू कडूंचा निर्धार
गावातील 125 लोकांनी स्टॅम्प पेपरवर लिहून दिलंय, पण मला तिथं 60 मतं; कोर्ट बदमाश, तरीही कोर्टात जाणार, बच्चू कडूंचा निर्धार
Deepak Kesarkar On Dhananjay Munde : वाल्मिक कराडला 100% अटक होणार,शंका बाळगू नका
Deepak Kesarkar On Dhananjay Munde : वाल्मिक कराडला 100% अटक होणार,शंका बाळगू नका
Adani Group Stocks: वर्षाच्या शेवटच्या दिवसात चित्र बदललं, अदानी ग्रुपच्या स्टॉक्समध्ये तेजी, 11 कंपन्यांचे शेअर कितीवर?  
वर्षाच्या शेवटच्या दिवसात चित्र बदललं, अदानी ग्रुपच्या स्टॉक्समध्ये तेजी, 11 कंपन्यांचे शेअर कितीवर?  
नवीन वर्षाच्या स्वागतावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त, सुरक्षेसाठी 12 हजार पोलीस तैनात, गृहराज्यमंत्री योगेश कदमांची माहिती 
नवीन वर्षाच्या स्वागतावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त, सुरक्षेसाठी 12 हजार पोलीस तैनात, गृहराज्यमंत्री योगेश कदमांची माहिती 
Pune Crime : नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुण्यात मोठी कारवाई, तब्बल एक कोटीची बनावट दारू जप्त, 9 जणांना बेड्या
नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुण्यात मोठी कारवाई, तब्बल एक कोटीची बनावट दारू जप्त, 9 जणांना बेड्या
Pawan Kalyan On Allu Arjun : हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुनला बेडरुममध्ये उचललं; पवन कल्याण यांच्याकडून सीएम रेवंत रेड्डींचं कौतुक, नेमकं काय म्हणाले?
हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुनला बेडरुममध्ये उचललं; पवन कल्याण यांच्याकडून सीएम रेवंत रेड्डींचं कौतुक, नेमकं काय म्हणाले?
Embed widget