एक्स्प्लोर

सरकार दहशतवादाबद्दल गंभीर नाही, 56 इंच छाती केवळ भाषणापुरतीच, सुप्रिया सुळेंची टीका

बारामती रेल्वे स्थानकात सुरु असलेल्या कामांची आज खासदार सुप्रिया सुळे यांनी पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारच्या धोरणांवर कडाडून हल्ला चढवला.

बारामती  : दहशतवादी हल्ल्याच्या इशाऱ्यामुळं मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज संपूर्ण देशात अस्वस्थता असताना सरकार दहशतवादाबद्दल गंभीर नाही ही बाब दुर्दैवी असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. बारामती रेल्वे स्थानकात सुरु असलेल्या कामांची आज खासदार सुप्रिया सुळे यांनी पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारच्या धोरणांवर कडाडून हल्ला चढवला. मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आल्याबद्दल बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, सातत्यानं सुरक्षितता आणि रोजगारीबद्दल बोललं जात होतं. पण सध्या दहशतवादाशिवाय दुसरं काहीही ऐकायला मिळत नाही. पुलवामाच्या घटनेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी फोटोसेशन करण्यात व्यस्त होते. हे सरकार दहशतवादाबद्दल गंभीर नाही ही बाब दुर्दैवी आहे.. केवळ भाषणापुरतंच 56 इंच छाती असल्याचं सांगितलं गेलं. नोटबंदीनंतर दहशतवाद कमी होईल असंही सांगण्यात आलं.  मात्र गेल्या दोन वर्षात कधी नव्हती इतकी अस्वस्थता संपूर्ण देशात पहायला मिळत असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. सरकार धनगर समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोप केंद्र आणि राज्य सरकार धनगर समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोप करत त्यांनी राज्य शासनानं आरक्षणाबाबत कोणताही प्रस्ताव पाठवलेला नसल्यानं हा विषय रेंगाळत  पडल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. मुंबईत धनगर समाज आरक्षणाबद्दलची बैठक निष्फळ ठरली आहे. याविषयी बोलताना सुप्रिया सुळे यांनी याबद्दल आश्चर्य वाटत नसल्याचं म्हटलं. बारामतीत जेव्हा आंदोलन झालं तेव्हाच हे फसवं आश्वासन असल्याचं जाणवलं होतं.  राज्य सरकारनं आजपर्यंत धनगर आरक्षण प्रस्तावाचा एकही कागद दिलेला नाही.केंद्र आणि राज्यातलं भाजप सरकार केवळ या कष्टकरी समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. हे सरकार कष्टकरी, शेतकरी, कामगार, महिला यांच्या हिताविरोधातलं सरकार आहे.. त्यांना आजतागायत या घटकांचे प्रश्नच समजत नाहीत. शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्याचं काम या सरकारनं केलं आहे. शेतकऱ्यांचं खच्चीकरण केलं आहे. सरकारच्या धोरणांमुळेच हा देश विकासात मागे पडल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. चुकीचं काम करणाऱ्या सरकारला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. त्यामुळं देशात आणि राज्यात महाआघाडी करुनच निवडणुका लढवल्या जाणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

'जशी आम्ही अंगणवाडी सेविकांना भाऊबीज द्यायचो, तशीच ही दुष्काळी मदत दिवाळीसाठी; पंकजा मुंडे टीकाकारांना म्हणाल्या..
'जशी आम्ही अंगणवाडी सेविकांना भाऊबीज द्यायचो, तशीच ही दुष्काळी मदत दिवाळीसाठी; पंकजा मुंडे टीकाकारांना म्हणाल्या..
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
Gopichand Padalkar: 'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
Tesla Roadster Car Elon Musk: एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
Ramdas Kadam On Tejas Thackeray : तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
Sandeep Deshpande : तुम्ही सत्तेत असताना फेल ठरलाय, आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्ही मतदानाद्वारे बदल करणार, संदीप देशपांडेंचं भाजपला प्रत्युत्तर
तुम्ही अपयशी ठरलाय,आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्ही मतदानाद्वारे बदल करणार, संदीप देशपांडेंचं भाजपला प्रत्युत्तर
Embed widget