एक्स्प्लोर

महाराष्ट्र शाससनानं घेतली देहविक्री करणाऱ्या महिलांची दखल, एबीपी माझानं मांडलेली व्यथा

मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अहमदनगर या शहरात देहविक्री व्यवसायातील महिला मोठ्या संख्येने आहेत. लॉकडाऊनमुळे या महिलांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे.

मुंबई : मंगेशकर कुंटुबियांनंतर आता महाराष्ट्र शाससनाने देहविक्री करणाऱ्या महिलांची दखल घेतली आहे. एबीपी माझानं देहविक्री करणाऱ्या महिलांची व्यथा मांडली होती. देहविक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांच्या समस्यांकडे एरवी समाजाचे लक्ष जात नाही. या व्यवसायात नाईलाजाने आलेल्या महिलांची परिस्थिती सुधारण्यासाठी, त्यांना सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी महिला व बालविकास विभाग प्रयत्न करतो. सध्याच्या 'कोविड-19' परिस्थितीत या महिलांच्या उत्पन्न बंद झाल्याने कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी विभागाच्या सर्व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना सूचना देऊन देहविक्री व्यवसायातील महिलांना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू तसेच व्यक्तिगत स्वच्छता साधने पुरवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आत्तापर्यंत राज्यातील या व्यवसायातील सुमारे साडेबारा हजार महिलांपर्यंत पोहोचत त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था राज्य शासनाने केली आहे.

लॉकडाऊनमुळे संपूर्ण समाजालाच अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः हातावर रोज काम केल्याशिवाय उदरनिर्वाह होऊ न शकणारे मजूर, कारखान्यातील, बांधकामावरील मजूर आदींच्याबाबतीत दोन वेळच्या अन्नाचा प्रश्न निर्माण झाला. देहविक्री करणाऱ्या महिलांपुढेही गंभीर समस्या उभी राहिली आहे. हे लक्षात येताच यशोमती ठाकूर यांनी तात्काळ विभागाच्या सचिव, महिला व बालविकास आयुक्त आदींसह व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना या महिलांना मदत उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणा त्वरित गतिमान करण्याचे निर्देश दिले. या कामात स्वयंसेवी संस्थांनीही शासनासोबत काम करत खूप चांगले सहकार्य केले आहे.

मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अहमदनगर या शहरात देहविक्री व्यवसायातील महिला मोठ्या संख्येने आहेत. मुंबई शहर जिल्ह्यातील कामाठीपुरा, फोकलँड, खेतवाडी, काँग्रेस हाऊस, सिप्लेक्स बिल्डिंग, अँटॉप हिल, पारस रोड, दामोदर मॅन्शन या क्षेत्रात देहविक्री करणाऱ्या महिला राहत आहेत. या महिलांच्या मुलांसाठी दिवसरात्र खुली निवारागृहे चालवली जात आहेत. शासनासोबतच 15-16 सामाजिक संस्था त्यांच्यासाठी काम करत असून महानगरपालिकेमार्फत अन्नाचे डबे त्यांच्यापर्यंत पोहोचवले जात आहेत.

या महिलांना पुढील 15 दिवस पुरेल इतके अन्नधान्याचे (रेशन) किट पुरवण्यात आले असून त्यानंतरही महिनाभराचे रेशन पुरवण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे. त्याचबरोबर सॅनिटायजर्स, सॅनिटरी किट, सोया बिस्किटे व इतर खाद्य वस्तू या वस्त्यांमध्ये पुरवण्यात येत आहेत. अन्नधान्य पुरवठ्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्यावतीने मोफत सुलभ शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. 'एचआयव्ही'ग्रस्त महिलांसाठी 'एआरटी' उपचारपद्धती सुरू असून नियमीतपणे औषधे पुरवण्यात येत आहेत.

पुणे जिल्ह्यात सुमारे 2 हजार 500 महिला देहविक्री व्यवसायात असून त्यांच्यासाठी काम करणाऱ्या 12-13 संस्थांनी पोलिसांच्या मदतीने त्यांच्यापर्यंत अन्नधान्य, रेशन किट, सॅनिटरी किट पोहोचवले केले आहे. फरासखाना पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी या मदत कार्यात विशेष भूमिका बजावली आहे. तसेच आरोग्य विभागाकडून नियमित आरोग्य तपासणी केली जात आहे. बुधवार पेठमध्ये देहविक्रेत्या महिलांच्या मुलांची संख्या मोठी असून त्यांच्यासाठी शासकीय दूध योजनेतून दुधाचा पुरवठा करण्यात येत आहे. यासाठी कात्रज दूध संघाने मदत केली आहे. 'सहेली' संस्थेने येथील महिलांच्या मोबाईल रिचार्ज केले असून त्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबांशी संवाद साधता येत असल्याने मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी त्याची मदत झाली आहे.

नाशिक, अहमदनगर, नागपूर आदी मोठ्या शहरांसोबतच सर्वच जिल्ह्यात या महिलांसाठी रेशन किट वाटप, सॅनिटरी किट वाटप आदी उपक्रम सुरू असून अनेक स्वयंसेवी संस्था तसेच या महिलांच्या मुलांसाठी चाईल्डलाईन संस्था काम करत आहे. काही जिल्ह्यात नोंदणी नसलेल्या छुप्या पद्धतीने देहविक्री व्यवसायात महिला असून त्यांनाही मदत मिळावी यासाठी महिला व बालविकास विभाग अन्य शासकीय यंत्रणा तसेच स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. या व्यवसायातील शिधापत्रिका नसलेल्या महिलांनाही शासनाच्या वितरण व्यवस्थेमार्फत रेशन पुरवठा व्हावा यादृष्टीने पाठपुरावा सुरू आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Amravati Crime News: पीडित मुली सर्व मुस्लीम, एकही हिंदू नाही, नवनीत राणा हिंदू धर्मियांना बरबाद करताय, त्यांच्यावर पोक्सो दाखल करा; परतवाडा प्रकरणावरून राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष संतापले
पीडित मुली सर्व मुस्लीम, एकही हिंदू नाही, नवनीत राणा हिंदू धर्मियांना बरबाद करताय, त्यांच्यावर पोक्सो दाखल करा; परतवाडा प्रकरणावरून राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष संतापले
Live Blog Updates: लोकसभेत आज महिला आरक्षण विधेयकावर मतदान
Live Blog Updates: लोकसभेत आज महिला आरक्षण विधेयकावर मतदान
Shiv Sena UBT Candidate Vidhan Parishad Election 2026 मोठी बातमी: अंधारे, विचारे, दानवे, चव्हाण...शिवसेना ठाकरे गटाकडून विधानपरिषदेसाठी 6 नावांची चर्चा; कुणाला मिळणार संधी?
मोठी बातमी: अंधारे, विचारे, दानवे, चव्हाण...ठाकरे गटाकडून विधानपरिषदेसाठी 6 नावांची चर्चा; कुणाला मिळणार संधी?
Nagpur Crime News : अवघ्या 200 रुपयांच्या जुन्या वादातून सागरचा बळी घेतला; सर्व 11 मारेकरी अल्पवयीन; नागपूर पोलिसांची धक्कादायक माहिती
अवघ्या 200 रुपयांच्या जुन्या वादातून सागरचा बळी घेतला; सर्व 11 मारेकरी अल्पवयीन; नागपूर पोलिसांची धक्कादायक माहिती

व्हिडीओ

Animal Parlor : साताऱ्यातील पाटणमध्ये जनावरांचं ब्युटी पार्लर Special Report
Women Reservation : महिला आरक्षण विधेयकावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने Special Report
Nashik TCS : नाशिकच्या टीसीएसप्रकरणी रिसॉर्टवर कारवाई, कारागृहात धुलाई Special Report
Ayan Ahmad Amravati : रील स्टार अयान अहमद कसा बनला गुन्हेगार? Special Report
Bhondu Baba : मुंबईच्या मालाडमधील भोंदूबाबाचा पर्दाफाश Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमेरिकेत अणु आणि अंतराळ संशोधनाशी संबंधित तब्बल पाच बेपत्ता शास्त्रज्ञांचा गूढ परिस्थितीत मृत्यू; सर्वच्या सर्व मोबाईल, पाकीट, चाव्या घरीच ठेवत पायी निघून गेले ते परत आलेच नाहीत!
अमेरिकेत अणु आणि अंतराळ संशोधनाशी संबंधित तब्बल पाच बेपत्ता शास्त्रज्ञांचा गूढ परिस्थितीत मृत्यू; सर्वच्या सर्व मोबाईल, पाकीट, चाव्या घरीच ठेवत पायी निघून गेले ते परत आलेच नाहीत!
Shreyas Iyer Catch Video: एका टप्प्यावर मुंबई दोनशेपार दिसत होती, मात्र का झाली नाही? कॅप्टन श्रेयस अय्यरच्या अवघ्या चार शब्दांच्या उत्तरानं सर्वांनाच जिंकलं!
Video: एका टप्प्यावर मुंबई दोनशेपार दिसत होती, मात्र का झाली नाही? कॅप्टन श्रेयस अय्यरच्या अवघ्या चार शब्दांच्या उत्तरानं सर्वांनाच जिंकलं!
Donald Trump : आसिम मुनीर तेहरानमध्ये दाखल, तिकडे डोनाल्ड ट्रम्प यांचा पाकिस्तानवर प्रेमाचा वर्षाव; शांतता कराराबाबत केली मोठी घोषणा, म्हणाले, इराणसोबत लवकरच...
आसिम मुनीर तेहरानमध्ये दाखल, तिकडे डोनाल्ड ट्रम्प यांचा पाकिस्तानवर प्रेमाचा वर्षाव; शांतता कराराबाबत केली मोठी घोषणा, म्हणाले, इराणसोबत लवकरच...
Hardik Pandya: 'जबाबदारी घ्यावीच लागेल', पंजाबने धुळ चारताच हार्दिक पांड्या कुणावर भडकला? तिकडं सेहवागनं सुद्धा भळभळत्या जखमेवर मीठ चोळलं!
Video: 'जबाबदारी घ्यावीच लागेल', पंजाबने धुळ चारताच हार्दिक पांड्या कुणावर भडकला? तिकडं सेहवागनं सुद्धा भळभळत्या जखमेवर मीठ चोळलं!
Nashik Crime News: नाशिकच्या राजकारणात 'गुन्ह्यांची हॅटट्रिक'; एकाच दिवशी तीन बड्या नेत्यांवर गुन्हे, शहरात मोठी खळबळ
नाशिकच्या राजकारणात 'गुन्ह्यांची हॅटट्रिक'; एकाच दिवशी तीन बड्या नेत्यांवर गुन्हे, शहरात मोठी खळबळ
Amravati Crime: 'बॉस' लिहलेला टी-शर्ट, भर रस्त्यात बर्थडे सेलिब्रेशन, चक्क वर्दीतल्या पोलिसांनीच आरोपी अयानला केक भरवला; परतवाडा व्हिडीओ व्हायरल प्रकरणाला नवं वळण
'बॉस' लिहलेला टी-शर्ट, भर रस्त्यात बर्थडे सेलिब्रेशन, चक्क वर्दीतल्या पोलिसांनीच आरोपी अयानला केक भरवला; अमरावतीच्या परतवाडा व्हिडीओ व्हायरल प्रकरणाला नवं वळण
Dilip Kumar Nephew Ayub Khan Flop In Bollywood: सुपरस्टार दिलीप कुमार यांचा पुतण्या, पण बॉलिवूडमध्ये नाही चालला 'या' अभिनेत्याचा पत्ता; 32 फिल्म 30 शो करुनही ठरला 'सुपरफ्लॉप'
सुपरस्टार दिलीप कुमार यांचा पुतण्या, पण बॉलिवूडमध्ये नाही चालला 'या' अभिनेत्याचा पत्ता; 32 फिल्म 30 शो करुनही ठरला 'सुपरफ्लॉप'
Nashik Crime News: नाशिकमधील धर्मांतर प्रकरणात परदेशातून फंडिंग? आता थेट NIA करणार तपास, राष्ट्रीय महिला आयोगाची टीमही नाशिकमध्ये येणार
नाशिकमधील धर्मांतर प्रकरणात परदेशातून फंडिंग? आता थेट NIA करणार तपास, राष्ट्रीय महिला आयोगाची टीमही नाशिकमध्ये येणार
Embed widget