![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Sunetra Pawar Interview : पार्थने राजकारणात यायच की नाही हे त्याने ठरवायचं, सुनेत्रा पवार यांची खास मुलाखत
Sunetra Pawar Interview : ''पार्थने राजकारणात यायच की नाही हे त्याने ठरवायचय. मुलं मोठी आहेत. त्यांना त्यांचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे, असं अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार म्हणाल्या आहेत.
![Sunetra Pawar Interview : पार्थने राजकारणात यायच की नाही हे त्याने ठरवायचं, सुनेत्रा पवार यांची खास मुलाखत Sunetra Pawar interview Parth should decide enter politics or not exclusive interview with ncp leader ajit pawar wife Sunetra Pawar Sunetra Pawar Interview : पार्थने राजकारणात यायच की नाही हे त्याने ठरवायचं, सुनेत्रा पवार यांची खास मुलाखत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/12/9c05b8f3ee6647321a190cd96323d8701676223719873384_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sunetra Pawar Interview : ''पार्थने राजकारणात यायच की नाही हे त्याने ठरवायचय. मुलं मोठी आहेत. त्यांना त्यांचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार म्हणाल्या आहेत. एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत अजित पवार, शरद पवार आणि आपल्या वैक्तिक आयुष्याबाबत मनमोकळेपणाने बोलले आहेत.
Sunetra Pawar Interview : अशी झाली स्वच्छता कामांची सुरुवात
सामाजिक कामना कशी सुरुवात झाली याबाबत सांगताना सुनेत्रा पवार म्हणाल्या आहेत की, ''2000 साली दादा (Ajit Pawar) सातारचे पालकमंत्री असताना आम्ही सातारच्या गेस्ट हाऊसला होतो. तेव्हा सातारा जिल्ह्यातील निढळ गावात एका कार्यक्रमाला गेलो होतो. त्यावेळचे ग्रामीण विकास मंत्री आर. आर. पाटील (R R Patil) यांनी दादांना आमंत्रण दिले होते. दादा त्यांना म्हणाले होते की, सुनेत्राला घेऊन जा. मी त्या गावात गेले आणि लक्षात आले की, एखादे गावही इतके सुंदर आणि स्वच्छ असू शकते. त्यातून मला प्रेरणा मिळाली. मी माझ्याच गावापासून सुरुवात करायच ठरवलं आणि माझ्या कामाची काटेवाडीतून सुरुवात झाली.'' त्या पुढे म्हणाल्या, ''लोक इतर कुठल्या कारणांसाठी एकत्र येतात पण अशा गोष्टींसाठी एकत्र येणं अवघड असतं. आधी लोकाना एकत्र आणलं. सुरुवातीला लक्षात आलं की, गावातील 80 टक्के लोकांकडे स्वच्छतागृह नाहीत. त्यावर आम्ही काम करायच ठरवलं. आम्ही काम सुरु केलं पण पुरस्कार देताना आम्हाला नापास करण्यात आलं. परिक्षकांना वाटलं असेल की आम्हाला गुण दिले तर पक्षपात केल्याचा आरोप होईल. म्हणून त्यांनी सुरुवातीला डावललं. आम्ही महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांचं आयुष्य बदलायच ठरवलं.''
Sunetra Pawar Interview : 'कोणत्याही परिस्थितीत डगमगायच नाही, हे मी शरद पवार यांच्याकडून शिकले'
आपल्या कुटुंबियांबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, ''मी पवार कुटुंबीयांकडून खुप शिकले. शारदाबाई पवार हयात नव्हत्या, जेव्हा मी या घरात आले. पण मला त्यांचा वारसा मिळाला. शरद पवार यांच्याकडून मी हे शिकलं की कोणत्याही परिस्थितीत डगमगायच नाही. अजित दादांचे वेळेचे नियोजन आणि कष्ट करण्याची तयारी सगळ्यांनी शिकण्यासारखी आहे. प्रतिभा काकी पवार या माझ्या आदर्श आहेत. मी त्यांच्याकडून मी अनेक गोष्टी शिकले.''
Sunetra Pawar Interview : 'शरद पवारांशी बोलताना आदरयुक्त दडपण असतं'
शरद पवार यांच्याबद्दल बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, ''आमची पुढची पिढी एकमेकांशी नातेसंबंध कायम ठेवून राहील, कारण शरद पवारांचे संस्कार. आमच्या घरातील नविन पिढी कुठेही, अगदी परदेशात जरी असली तरी एकमेकांशी संबंध राखून असते.'' त्या म्हणाल्या, ''शरद पवारांशी बोलताना आदरयुक्त दडपण असतं. पण शरद पवार हे चालते बोलते विश्वकोश आहेत. त्यांच्या आजूबाजूला जरी नुसते वावरले तरी खुप शिकायला मिळतं.''
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)