एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
शिवशाही बसमधून अचानक पिवळ्या धुराचे लोट, प्रवासी घाबरले
लातूरहून परभणीकडे निघालेल्या शिवशाही बसच्या खालच्या बाजूकडून अचानक पिवळा धूर निघू लागला. या अचानक घडलेल्या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं.
![शिवशाही बसमधून अचानक पिवळ्या धुराचे लोट, प्रवासी घाबरले suddenly yellow smoke come from shivshahi bus in Latur शिवशाही बसमधून अचानक पिवळ्या धुराचे लोट, प्रवासी घाबरले](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/10223414/shivshahi-latur.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
लातूर : एसटी महामंडळाने सुरु केलेल्या शिवशाही या वातानुकूलित बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र विविध प्रकारच्या अडचणींमुळे ही बस चर्चेत आहे. लातूरहून परभणीला जाणाऱ्या बसमध्येही काही तरी तांत्रिक बिघाड झाला, ज्यामुळे प्रवासी चांगलेच घाबरले.
लातूरहून परभणीकडे निघालेल्या शिवशाही बसच्या खालच्या बाजूकडून अचानक पिवळा धूर निघू लागला. या अचानक घडलेल्या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. MH 06 BW 890 या क्रमांकाची लातूर आगाराची ही शिवशाही बस होती.
ही शिवशाही बस लातूर येथील अंबाजोगाई रोडवर असलेल्या नवीन बसस्थानकाच्या प्रवेश द्वारामधून बाहेर पडत होती. याच वेळी चालकाच्या बाजूने बसच्या खालच्या भागातून पिवळा धूर निघून लागला आणि मोठा आवाज सुरू झाला.
चालकाच्या ही बाब लक्षात येताच त्याने गाडी जागीच थांबवली आणि आतील प्रवासी घाबरुन बाहेर आले. यात अंबाजोगाईचेही अनेक प्रवासी होते. यावेळी बाहेर पडलेल्या प्रवाशांना स्फोट वगैरे होतो की काय अशी भीती वाटू लागली होती, असं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं.
दरम्यान, यापूर्वीही शिवशाही अंबाजोगाई आगाराच्या शिवशाही बसचं पुढचं चाक 6 मे रोजी अचानक फुटलं होतं. मध्यरात्री ही घटना झाली आणि त्यानंतर एसटी महामंडळाकडून कोणतीही मदत देण्यात आली नव्हती, ज्यामुळे प्रवाशांना संपूर्ण रात्र रस्त्यावर काढावी लागली.
संबंधित बातमी :
शिवशाहीचा टायर फुटला, मदत न मिळाल्याने प्रवासी रात्रभर रस्त्यावर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
कोल्हापूर
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)