एक्स्प्लोर

Success story : दूध उत्पादनातून आर्थिक समृद्धी, 100 म्हशी आणि 100 एकर जमीन; वाचा रामेश्वर मांडगेंची यशोगाथा

Success story : हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील शेतकऱ्यानं दूध व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक समृद्धी आणली आहे. तीन एकर शेती आणि एका म्हशीपासून सुरु केलेला व्यवसाय आता विस्तारला आहे.

Success story : शेतीला जोडव्यवसाय म्हणून अनेक शेतकरी दुधाचा व्यवसाय (Dairy Farming) करतात. या व्यवसायातून ते स्वत:ची आर्थिक प्रगतीही साधत आहेत. अशाच एका हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील शेतकऱ्यानं दूध व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक समृद्धी आणली आहे. तीन एकर शेती आणि एका म्हशीपासून सुरु केलेला व्यवसाय आता विस्तारला आहे. आज त्या शेतकऱ्याकडे 100 एकर शेती आणि 100 म्हशी आहेत. रामेश्वर मांडगे असं हिंगोली जिल्ह्यातील बेलवाडी येथील शेतकऱ्याचे नाव आहे.

म्हशींच्या व्यवस्थापनासाठी दोन प्रकारचे गोठे 

शेतकरी रामेश्वर मांडगे यांच्याकडे मुरा आणि जाफराबादी प्रजातीच्या 100 म्हशी आहेत. म्हशी जास्त म्हणल्यावर त्यांना चाराही जास्त लागणार. दरवर्षी शेतकरी रामेश्वर मांडगे स्वतः कडे असलेल्या 60 ते 70 एकर शेत जमिनीवर वर्षभर पुरेल एवढ्या चाऱ्याची लागवड करतात. या म्हशींना दररोज लागवड केलेल्या चाऱ्यापैकी दोन ट्रॉल्या चारा दिला जातो. त्याचबरोबर या चाऱ्यासोबत हरभरा, ज्वारी, करडई, मका हे धान्य भरडून दररोज सरकी पेंडीचा खुराक एकत्र करुन म्हशींना दिला जातो. या म्हशींच्या शेतकरी मांडगे यांनी दोन प्रकारचे गोठे बांधले आहेत. एक बंदिस्त प्रकारचा गोठा आणि दुसरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने अध्यायावत केलेला एक गोठा आहे. या दोन्ही गोठ्यात या म्हशींचं व्यवस्थापन केलं जातं.

म्हशींसाठी खास स्विमिंग पूल

100 म्हशींच्या व्यवस्थापनासाठी दररोज याठिकाणी पाच ते सहा कामगार राबतात. या म्हशींच्या व्यवस्थापनासाठी हे कामगार दररोज सकाळी तीन वाजल्यापासून ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत राबतात. सकाळी दूध काढल्यानंतर या म्हशींना बंदिस्त गोठ्यामध्ये नेलं जातं. दुपारच्या वेळी उन्हाच्या फटक्यापासून म्हशींचा बचाव व्हावा यासाठी शेतकरी मांडगे यांनी खास स्विमिंग पूल बांधला आहे. 

दररोज 350 ते 400 लिटर दूध निघते

दूध व्यवसायातून मांडगे यांनी आर्थिक समृद्धी मिळवली आहे. आज त्यांच्याकडे 100 एकर शेती आणि 100 म्हशी आहेत. परंतु काही वर्षांपूर्वी मांडगे यांच्या कपाळी गरिबीचा शिक्का लागलेला होता. हा शिक्का कसा पुसायचा याच विचारातून त्यांचे वडील आणि रामेश्वर मांडगे यांनी एक म्हैस आणि तीन एकर शेतीमधून या दुग्ध व्यवसायाची सुरुवात केली होती. आज त्यांच्याकडे 100 म्हशी आहेत. या म्हशीपासून दररोज 350 ते 400 लिटर दूध निघते. हे दूध कामगार आणि मांडगे स्वतः घरोघरी विकतात. त्याचबरोबर म्हशीच्या शेणाचा खत म्हणून वापर केल्याने मांडगे यांच्याकडे असलेल्या शंभर एकर शेतीमध्ये लागणारा खताचा खर्च कमी झाला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Milk Production : भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश, जागतिक उत्पादनात 24 टक्के वाटा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Millionaire Formula: करोडपती होण्याचा साधा, सरळ, सोपा मार्ग, एकदाच 1 लाख गुंतवा, कोट्याधीश व्हा, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Millionaire Formula: करोडपती होण्याचा साधा, सरळ, सोपा मार्ग, एकदाच 1 लाख गुंतवा, कोट्याधीश व्हा, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Maharashtra Rain : सावधान! आज राज्यात मुसळधार पाऊस पडणार, कुठं ऑरेंज तर कुठं यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज
Maharashtra Rain : सावधान! आज राज्यात मुसळधार पाऊस पडणार, कुठं ऑरेंज तर कुठं यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज
साखरेचं प्रमाण कमी, किडणीवर परिणाम, रविकांत तुपकरांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात दाखल
साखरेचं प्रमाण कमी, किडणीवर परिणाम, रविकांत तुपकरांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात दाखल
Rajendra Raut on Manoj Jarange : मनोज जरांगेंनी कोणाची सुपारी घेतली? तुमच्या हॉस्पिटलमध्ये राजेश टोपेंच्या टाळ्या कशा वाजतात? राजेंद्र राऊतांचा सवाल
मनोज जरांगेंनी कोणाची सुपारी घेतली? तुमच्या हॉस्पिटलमध्ये राजेश टोपेंच्या टाळ्या कशा वाजतात? राजेंद्र राऊतांचा सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Salman Khan Ganpati Bappa : सलमान खानच्या घरच्या बाप्पाचं आज विसर्जनABP Majha Headlines :  8  AM :  8 सप्टेंबर 2024 : Maharashtra News :एबीपी माझा हेडलाईन्सDagdusheth Halwai Ganpati : पुण्यात हजारो महिलांनी एकत्र येत केलं अथर्वशीर्ष पठणTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :8 सप्टेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Millionaire Formula: करोडपती होण्याचा साधा, सरळ, सोपा मार्ग, एकदाच 1 लाख गुंतवा, कोट्याधीश व्हा, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Millionaire Formula: करोडपती होण्याचा साधा, सरळ, सोपा मार्ग, एकदाच 1 लाख गुंतवा, कोट्याधीश व्हा, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Maharashtra Rain : सावधान! आज राज्यात मुसळधार पाऊस पडणार, कुठं ऑरेंज तर कुठं यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज
Maharashtra Rain : सावधान! आज राज्यात मुसळधार पाऊस पडणार, कुठं ऑरेंज तर कुठं यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज
साखरेचं प्रमाण कमी, किडणीवर परिणाम, रविकांत तुपकरांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात दाखल
साखरेचं प्रमाण कमी, किडणीवर परिणाम, रविकांत तुपकरांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात दाखल
Rajendra Raut on Manoj Jarange : मनोज जरांगेंनी कोणाची सुपारी घेतली? तुमच्या हॉस्पिटलमध्ये राजेश टोपेंच्या टाळ्या कशा वाजतात? राजेंद्र राऊतांचा सवाल
मनोज जरांगेंनी कोणाची सुपारी घेतली? तुमच्या हॉस्पिटलमध्ये राजेश टोपेंच्या टाळ्या कशा वाजतात? राजेंद्र राऊतांचा सवाल
Nanded : नांदेडमधील हॉटेल व्यावसायिकाच्या मृत्यूचे गुढ उलगडले, मुलानेच सुपारी देऊन काढला वडिलांचा काटा
Nanded : नांदेडमधील हॉटेल व्यावसायिकाच्या मृत्यूचे गुढ उलगडले, मुलानेच सुपारी देऊन काढला वडिलांचा काटा
Wine : वाईन खराब होते का? बाटली उघडल्यानंतर वाईन किती दिवसात प्यावी? रेड वाईन, पोर्ट वाईन किती दिवस टिकते?
वाईन खराब होते का? बाटली उघडल्यानंतर वाईन किती दिवसात प्यावी? रेड वाईन, पोर्ट वाईन किती दिवस टिकते?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 सप्टेंबर 2024 | शनिवार
Basmati Export: बासमतीची निर्यात 15% ने वाढली हो! अमेरिकेसह 'या' देशांमध्ये वाढली मागणी
बासमतीची निर्यात 15% ने वाढली हो! अमेरिकेसह 'या' देशांमध्ये वाढली मागणी
Embed widget