CBI Director : सीबीआय प्रमुख सुबोधकुमार जयस्वाल यांचा आतापर्यंतचा प्रवास आणि परिचय
जयस्वाल यांनी इंटेलिजन्स ब्युरो आणि महाराष्ट्र एटीएस चीफ म्हणूनही काम केले आहे.
मुंबई : सुबोधकुमार जयस्वाल यांचा जन्म: 22 सप्टेंबर 1962 धनबाद इथे झाला. 1985 बॅचचे आयपीएस अधिकारी सुबोध जयस्वाल सीबीआय चीफ होण्याआधी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) महासंचालक होते. महाराष्ट्रातील माजी पोलिस महासंचालक, दत्तात्रय पडसलगीकर यांच्या पश्चात ते मुंबईचे पोलिस आयुक्त झाले आणि त्यानंतर डीजीपी महाराष्ट्र पोलीस.
जयस्वाल हे नऊ वर्षे भारताच्या बाह्य इंटेलिजेंस एजन्सीच्या रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (आरए अँडडब्ल्यू) कडे होते, त्या काळात त्यांनी आरए अँडडब्ल्यूचे अतिरिक्त सचिव म्हणून तीन वर्षे काम पाहिले. जयस्वाल यांनी इंटेलिजन्स ब्युरो आणि महाराष्ट्र एटीएस चीफ म्हणूनही काम केले आहे. ते केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे प्रमुख होते.
पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखालील पॅनेलने सीबीआय प्रमुखाचे पद महाराष्ट्र पोलीस ते माजी डीजीपी सुबोध कुमार जयस्वाल यांच्याकडे दिले. या पदासाठी शॉर्टलिस्ट केलेल्या अधिकाऱ्यांपैकी ते सर्वात वरिष्ठ असल्याचे म्हंटलं जात आहे.
माजी प्रमुख रिशि शुक्ल यांचा फेब्रुवारी महिन्यातील कार्यकाळ संपल्यानंतर पासून सीबीआय प्रमुख हे पद रिक्त होतं. सीबीआयचे अतिरिक्त संचालक प्रवीण सिन्हा हे एजन्सीचे अंतरिम प्रमुख होते. सीबीआयचे नवे प्रमुख सुबोधकुमार जयस्वाल यांची नेमणूक पुढील दोन वर्षांसाठी केला गेली आहे. कायद्यानुसार सरकारी पॅनेल सीबीआय संचालकांची निवड 'ज्येष्ठता, सचोटी आणि भ्रष्टाचारविरोधी प्रकरणांच्या तपासाच्या अनुभवाच्या जोरावर' केली जाते.
CBI Director Appointment : सुबोधकुमार जयस्वाल यांची सीबीआय प्रमुखपदी नियुक्ती
महाराष्ट्रात पोस्टिंग दरम्यान जयस्वाल तेलगी घोटाळ्याच्या चौकशीत सहभागी होते. त्यांच्या चौकशीच्या आधारेच मुंबई पोलीसांचे तत्कालीन आयुक्त आर एस शर्मा सह इतर पोलीस अधिकारी ते कांस्टेबल पर्यंत सर्वांना अटक केली. नंतर हे प्रकरण सीबीआयकडे गेले. जयस्वाल हे राज्य राखीव पोलिसांचे प्रमुख राहिले आहेत. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र एटीएसमध्ये ही काम केलं. त्यांनी आपली सेवा कॅाल (संशोधन व विश्लेषण विभागाला ही दिली. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये ते पुन्हा राज्यात परतले, 2018 मध्ये त्यांना मुंबई पोलिस आयुक्त करण्यात आले. नंतर ते महाराष्ट्राचे डीजीपी झाले.
महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झालं आणि जयस्वाल यांची सरकार सोबत पोलीस बदल्यांवरुन मतभेद समोर आले. राज्यातील नवीन महाविकस आघाडी सरकारमध्ये आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीमध्ये होणारी राजकीय हस्तक्षेप हे या मतभेदाच कारण होतं. मुख्यमंत्री व सरकारच्या इतर बड्या नेत्यांकडेही त्यांनी नाराजी व्यक्त केली. पण त्याचा काही विशेष परिणाम दिसून आला नाही. प्रकरण इतक वाढल की राज्याचे डीजीपी हे पद सोडून ते केंद्रात परत गेले.
आता सचिन वाझेला अटक झाल्यानंतर कथित बदली घोटाळा प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआय चौकशी करीत आहे. अशा परिस्थितीत सुबोधकुमार जयस्वाल यांना सीबीआय पदावर नियुक्त करणे हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय मानला जातो आणि यांचे परिणाम राज्याच्या राजकरणात ही होतील असं म्हटले जातय.
जयस्वाल डीजी असतानाच रश्मी शुक्ला महाराष्ट्र इंटेलिजेंस विंगच्या आयुक्त होत्या. महाराष्ट्रातील आयपीएस ट्रान्सफर आणि पोस्टिंग प्रकरणात त्यांनी अनेकांचे फोन टॅप केले असा आरोप आहे. रश्मी शुक्ला यांनी तो अहवाल तत्कालीन डीजीपी सुबोधकुमार जयस्वाल यांना सादर केला. डीजीपींनी तो अहवाल गृहसचिव सीताराम कुंठा यांना सादर केला. परंतु त्या प्रकरणात कोणतीही कारवाई झाली नाही. रश्मी शुक्ला यांचीही बदली झाली आजमी जयस्वाल हे सीआयएसएफ डीजी म्हणून दिल्ली ला परतले.