एक्स्प्लोर
देशमुखांचा मुलगा आणि संजय काकडेंच्या मुलीचा शाही विवाह

पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या मुलांचं शाही थाटात लग्न झालं. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरींच्या मुलीचाही शाही विवाह सोहळा पार पडला. आता राज्याचे सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांच्या मुलाचा भव्यदिव्य लग्न सोहळा होणार आहे. सुभाष देशमुखांचा मुलगा रोहन आणि भाजपचे खासदार संजय काकडे यांची मुलगी कोमल यांचा विवाह पुण्यातील म्हालुंगे बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी सुरु आहे. संजय काकडे यांच्या कंपनीने न्यूकोपरे गावातील लोकांचं पुनर्वसन रखडवलंय. त्यासाठी काही दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी आंदोलनही केलं. पण त्यानंतरही संजय काकडेंनी या लोकांचं पुनर्वसन केलं नाही. आता मात्र मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी सुरु आहे. याशिवाय एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुसरीकडे लग्नांचा असा शाही थाट भाजपला शोभतो का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
आणखी वाचा























