महाराष्ट्रात वादळवारे...गारांसह अवकाळी पाऊस; दोन शेतमजूरांचा मृत्यू, फळबागा कोलमडल्या, जनावरं होरपळली, कुठे काय स्थिती?
गावरान पपईची लागवड करून शेतकरी चांगले पीक घेतात. पण राजेंद्र लटारे या शेतकऱ्याच्या मेहनतीवरच आता अवकाळीचे पाणी फेरले गेले आहे.

Unseasonal Rain राज्यात गेल्या चार दिवसांपासून वेगवेगळ्या भागात अवकाळीचे तीव्र इशारे देण्यात आले होते. राज्यभरात सोसाट्याच्या वाऱ्यासह गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात वादही वारे आणि गारपीटीचा इशारा होता. सलग तिसऱ्या दिवशी आज राज्यभरात ठिकठिकाणी पावसाने राज्याला झोडपले आहे. विदर्भासह खान्देशात अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झाले असून भंडाऱ्यात दोन शेतमजूरांचा वीज पडून मृत्यू झाला. वाशिम, वर्धा धुळे, नंदुरबार मध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावलाय. जालन्यात भोकरदरमध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडलाय. रब्बी, उन्हाळी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून उत्तर व मध्य महाराष्ट्रासह विदर्भ मराठवाड्यात वादळी वारे आणि अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. (Unseasonal Rain Maharashtra)
वर्ध्यात झालेल्या अवकाळी पावसाने सेलू तालुक्यातील अंतरगाव येथील शेतकऱ्याचे पपई पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. दीड एकर शेतातली पपईची फळबाग उध्वस्त झाली आहेय. तब्बल अकराशे झाडं तुटून पडल्याने या हंगामात येणारे पपईचे पीक हातचे गेले आहे. दीड वर्षात जोपासना केलेल्या पपईच्या पिकाला चार लाख रुपयांचा खर्च झाला. सहा ते सात लाख रुपये उत्पन्न येईल अशी अपेक्षा शेतकरी राजेंद्र नामदेवराव लटारे यांना होती. गावरान पपईची लागवड करून शेतकरी चांगले पीक घेतात. पण राजेंद्र लटारे या शेतकऱ्याच्या मेहनतीवरच आता अवकाळीचे पाणी फेरले गेले आहे.
वाशिममध्ये सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजा नुसार वाशिम जिल्ह्यात मेघ गर्जने सह विजेच्या कडकडाटात अवकाळी पावसाने हजेरी लावली ...सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस बरसल्याने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यां सह फळबाग उत्पादक शेकऱ्यांचे मोठं नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
धुळे शहरासह जिल्ह्यात काल अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने रब्बी हंगामाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे गहू हरभरा मका यासह फळबागांचे देखील नुकसान झाले असून साक्री तालुक्यात याचा सर्वाधिक फटका बसला आहे या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची प्रशासनाने तात्काळ पंचनामे करण्यास सुरुवात केली असून साक्री तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर प्रशासनाचे अधिकारी दाखल आहेत नुकसानीचे पंचनामे सुरू झाले असून शासनाने लवकरात लवकर नुकसान भरपाई येण्याची मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे...
शॉर्ट सर्किटमुळं गोठ्यातील जनावरं होरपळली
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसात जनावरं बांधायच्या गोठ्यावरून गेलेल्या विजांच्या तारांचा एकमेकांना स्पर्श झाला. यात शॉर्टसर्किट झाल्यानं त्याची ठिणगी भास्कर लांजेवार यांच्या गोठ्यावर पडली आणि गोठ्याला आग लागल्यानं तिथं बांधलेली १० म्हशी होरपळल्यात. या घटनेत ३ म्हशी गंभीर जखमी झाल्यात. ही घटना भंडाऱ्याच्या साकोली शहरातील सिव्हील वॉर्डात घडली. प्रशासनाने याचं सर्वेक्षण करून पशुपालकाला तातडीनं आर्थिक मोबदला द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. आज सकाळी विजेच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली. सध्या रब्बी पिकांचा हंगाम सुरू असून शेतावर काम करीत असताना अचानक वीज कोसळून दोन शेतमजुराचा मृत्यू झाला. मृतकात एका महिलेसह पुरुषाचा समावेश असून अन्य एक शेतमजूर दूर असल्यानं थोडक्यात बचावला. मनीषा भारत पुष्पतोडे (२५) आणि प्रमोद मणिराम नागपुरे (४५) असं विज पडून मृत झालेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघेही तुमसर तालुक्यातील पाथरी येथील रहिवासी आहे. यावेळी मृतक मनीषा पुष्पतोडे यांचा सासराही या शेतावर काम करीत होते. मात्र, ते त्यांच्यापासून दूर असल्यानं या घटनेतून ते बचावलेत.
हेही वाचा:
























