समुद्रामध्ये तुफान वादळ आणि लाटा, मच्छिमारांच्या तीन बोटी बुडाल्या
गुजरातमध्ये सध्या समुद्र खवळलेला आहे. या भागात पावसाचा जोर असल्याने समुद्रामध्ये तुफान वादळ निर्माण झालं आहे. यामुळं तीन बोटी बुडाल्याची माहिती समोर येत आहे.
Storm at sea : गुजरातमध्ये सध्या समुद्र खवळलेला आहे. या भागात पावसाचा जोर असल्याने समुद्रामध्ये तुफान वादळ निर्माण होत आहे. अमरेली, जाफराबाद आणि सोमनाथजवळ समुद्र खवळला असून तीन बोटी बुडाल्याची माहिती समोर येत आहे. सोमनाथजवळ एक बोट पंधरा नॉटिकल मैल अंतरावर होती, जेव्हा ती पाण्याने भरु लागली, तेव्हा इतर बोटींनी ती किनाऱ्यावर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र वादळ आणि समुद्राच्या लाटांमुळे बोट बुडाली आहे.
बोटी बुडू लागल्यावर इतर बोट मालकांनी बोटीत असणाऱ्या सर्व आठ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. वाचलेले मच्छिमार हे उमरगाम तालुक्यातील आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसाचा जोर मंगळवारीही कायम असून समुद्र खवळलेला आहे. त्यातच समुद्रातील वाऱ्याचा वेग वाढला असून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी तसेच पुणे सातारा व नाशिकच्या घाटमाथ्याला हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. वादळी वाऱ्यांची शक्यता असल्याने सर्व मच्छीमारांना प्रशासनाने धोक्याच्या सूचना दिल्या असून सतर्कतेचा इशाराही दिलाय. मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसांच्या सरी कोसळत आहेत .किनारपट्टीवर ही जोरदार पाऊस सुरू आहे .वाऱ्याचा वेग वाढला आहे .मुंबईच्या समुद्राला उधाण आले आहे.
राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस, शेती पिकांना फटका
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळं जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे. शेती पिकांचं देखील मोठं नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळे राज्यातील 19 जिल्ह्यात 20 लाख 12 हजार 775 एक्कर क्षेत्रावरील सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग यासह अन्य पिकांचं नुकसान झाल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वाशिम मध्ये पत्रकार परिषदेत बोलताना दिली. राज्यात सर्वाधिक 7 लाख 13 हजार 857 एक्कर क्षेत्राचे नुकसान नांदेड जिल्ह्यात झाला असून त्यापाठोपाठ वाशिम जिल्ह्यात 4 लाख 11 हजार 392 एकर क्षेत्रावर पिकाचे नुकसान झालंय. मात्र क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार केल्यास सर्वाधिक नुकसान वाशिम जिल्ह्यात असल्याचही भरणे यांनी सांगितले, या नुकसानीचे पंचनामे सुरू असून अहवाल मिळाल्यानंतर तात्काळ शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं भरणे यांनी सांगितलंय. राज्यातील ऑगस्ट 2025 मधील अतिवृष्टीमुळे खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला आहे. राज्यातील तब्बल 19 जिल्ह्यांमधील 187 तालुके आणि 654 महसूल मंडळांमध्ये मुसळधार पाऊस झाला असून मोठ्या प्रमाणावर शेतीपिकांचे नुकसान झाले आहे.
महत्वाच्या बातम्या:
सावधान! अरबी समुद्र खवळला, वादळी वाऱ्यांचा वेग वाढला, मच्छीमारांना प्रशासनाच्या धोक्याच्या सूचना, पावसाचा जोर किती राहणार ?
























