एक्स्प्लोर
Advertisement
खासदार उदयनराजे भोसलेंच्या गाडीवर दगडफेक
सातारा : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानेच उदयनराजेंच्या गाडीवर दगडफेक केल्याचा आरोप होत आहे.
साताऱ्यातील जावळी तालुक्यातील खर्शी मुरा गावामध्ये दगडफेकीची घटना घडल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते वसंत मानकुमरे यांनी दगडफेक केल्याचा आरोप होत आहे.
मेढा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी उदयनराजे पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेही मेढा पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत.
सुदैवाने उदयनराजे भोसले यांना दुखापत झाल्याचं कोणतंही वृत्त नाही. दगडफेकीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
क्राईम
फॅक्ट चेक
Advertisement