एक्स्प्लोर

अकोला-सिकंदराबाद रेल्वे मार्गावर दगड, मोठी दुर्घटना टळली

अकोला : रेल्वे रुळावर आडवा रॉड टाकल्याच्या मुंबईतील घटना समोर आल्यानंतर आता अकोला- सिकंदराबाद रेल्वे मार्गावरही बार्शिटाकळी तालुक्यातील अनकवाडी - लोहगड दरम्यान भला मोठा दगड आढळून आला आहे. या मार्गावरून जाणाऱ्या 'इंटरसिटी एक्सप्रेस'ला सुदैवाने कोणताही धोका निर्माण झाला नाही. काल संध्याकाळी 5.30 वाजताची घटना ही घटना असून अज्ञात व्यक्तीविरोधात बार्शिटाकळी पोलिसांत गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. दगड मोठा अस्लयाने रूळांमधील सिमेंट खांबाला तडे गेले आहेत. त्यामुळे दुरस्ती सुरु असून वाहतूकही सुरळीत आहे. मुंबई आणि उपनगरात तीन दुर्घटना टळल्या दरम्यान मुंबई आणि उपनगरात मोटरमनच्या सतर्कतेमुळे आतापर्यंत तीन दुर्घटना टळल्या आहेत. मुंबई आणि उपनगरी परिसरात मोठा रेल्वे अपघात घडवण्याचं षडयंत्र असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नवी मुंबईत गव्हाणफाटा जवळ रेल्वे ट्रॅकजवळ विजेचा खांब ठेवल्याचं समोर आलं. त्यामुळे मोठा घातपात घडवण्याचा कट शिजत असल्याची भीती वर्तवली जात आहे. आठवड्यात दुसऱ्यांदा अशाप्रकारे रेल्वे ट्रॅकवर संशयास्पद वस्तू आढळली आहे. मंगळवारी नवी मुंबईतील कळंबोली भागात रेल्वे रुळांवर लोखंडी रॉड ठेवल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर बुधवारी पनवेलपासून जवळ असलेल्या गव्हाणफाटा येथे रेल्वे ट्रॅकवर विजेचा खांब ठेवण्यात आला.हा रेल्वेमार्ग जेएनपीटीकडे जाणारा आहे. जेएनपीटी बंदरात येणारा माल हा मालगाड्यांच्या माध्यमातून आणला जातो. त्यासाठी या रेल्वेमार्गाचा वापर होतो. या प्रकरणी पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत दोन वेळा संबंधित रेल्वेगाड्यांच्या मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे मोठे अपघात टळले आहेत.

रेल्वे दहशतवाद्यांच्या टार्गेटवर?

गेल्या महिन्यात ओडिशाच्या सीमेजवळ असलेल्या आंध्र प्रदेशमधील कुनेरु स्टेशनजवळ जगदलपूर-भुवनेश्वर एक्सप्रेसचे 8 डबे रुळावरुन घसरले होते. या रेल्वे अपघातात 39 पेक्षा अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला होता. कानपूरमध्येही नोव्हेंबरमध्ये झालेल्या रेल्वे दुर्घटनेमागे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयचा हात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. इंदूर-पटना एक्स्प्रेसचा 20 नोव्हेंबर 2016 रोजी कानपूरच्या पुखराया स्टेशनजवळ भीषण अपघात झाला होता. ज्यामध्ये 150 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. संबंधित बातम्या :

दिवा-पनवेल मार्गावर मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला!

उभ्या रेल्वे ट्रॅकवर आडवा ट्रॅक, मुंबईत जनशताब्दी पाडण्याचा प्रयत्न?

हिराखंड एक्स्प्रेसचे 8 डबे घसरुन 39 प्रवाशांचा मृत्यू

पाटणा-इंदूर एक्स्प्रेसचे 14 डबे घसरले, 63 प्रवाशांचा मृत्यू

‘डबे घसरले नि डोळ्यादेखत त्या चिमुरडीच्या शरीराचे दोन तुकडे’

जखमेवर मीठ, कानपूर ट्रेन दुर्घटनेतील जखमींना जुन्या नोटा वाटप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 09 PM 20 January 2025Pankaja Munde on Beed Guardian Minister | बीडचं पालकमंत्रिपद दिलं असतं तर आनंद झाला असता-पंकजा मुंडेZero Hour Jitendra Awhad : धनंजय मुंडेंबाबत जितेंद्र आव्हाडांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Embed widget