एक्स्प्लोर

पाकिस्तानला धडकी भरणार, बॉर्डरवर छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

CM Eknath Shinde: भारत-पाकिस्तान बॉर्डरवर छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

Statue of Chhatrapati Shivaji Maharaj on India Pakistan Border : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची वाघनखं (Wagh Nakh) महाराष्ट्रात, मायदेशी आणली जाणार आहेत, हे देशासाठी अभिमानास्पद असून काहीजण मात्र त्याबाबत शंका उपस्थित करतायत, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी वाघनखांबाबत शंका उपस्थित करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे. वाघनखांबाबत आक्षेप घेणाऱ्यांनी छत्रपती शिवरायांचा आदर्श सोडून, अफझल खानाचा आदर्श स्विकारलेला दिसतोय, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी टोला लगावला आहे. तसेच, भारत-पाकिस्तानच्या सीमेवर छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा उभारला जाणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली आहे. मात्र, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलणं टाळलं आहे. मनोज जरांगेंच्या उपोषणाबाबतच्या प्रश्नांकडे मुख्यमंत्र्यांनी कानाडोळा केल्याचं पाहायला मिळालं. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य अश्वारुढ पुतळा आम्ही इथून पाठवला आहे. भारत पाकिस्तान सीमेवर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची स्थापना केली जाणार आहे. पाकिस्तानला देखील छत्रपती शिवरायांच्या तलवारीची भिती वाटेल."

वाघनखांबाबत शंका व्यक्त करणाऱ्यांनी अफझल खानाचा आदर्श स्विकारलेला दिसतोय : मुख्यमंत्री 

"आमचे मंत्री सुधीर मुनगंटीवार लंडनला स्वतः गेले. वाघनखं आहेत, त्याला इतिहास आहे. ती वाघनखं आपल्या देशात, आपल्या राज्यात आणणं हे प्रत्येक देशवासियासाठी गौरवास्पद, अभिमानास्पद आहे आणि प्रत्येकाला हेवा वाटावा असं देशासाठी अभिमानाचं काम आहे.  पण दुसरीकडे काही लोक, ज्यांना विरोध, द्वेष, मत्सर सरकारच्या प्रत्येक कामावर व्यक्त करतात. त्यांनीच वाघनखांबाबत आक्षेप व्यक्त केला आहे. शंका व्यक्त केली आहे. हे दुर्दैवी आहे. पण हे शंका व्यक्त करणारे लोक आहेत, त्यांनी छत्रपती शिवरायांचा आदर्श सोडून, अफझल खानाचा आदर्श स्विकारलेला दिसतोय. सांस्कृतिक कार्य विभाग काम करेल, वाघनखं येतील आणि छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या वस्तू आणण्याचा आम्ही प्रयत्न करू.", असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. 

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना गरिबांची गरज उरलेली नाही : मनोज जरांगे 

मराठा समाजाच्या मुलांचं भलं होऊ नये, असं सरकारचं षडयंत्र आहे त्याचसाठी आरक्षण दिलं जात नाहीये असा गंभीर आरोप उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी केला आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना गरिबांची गरज उरलेली नाही अशी टीका त्यांनी केली. 29 ऑक्टोबरला मराठा आंदोलनकर्त्यांची बैठक घेत पुढील दिशा ठरवली जाईल असं जरांगे म्हणाले. 

पाहा व्हिडीओ : Cm Eknath Shinde : वाघ नखाला एक इतिहास, सरकारच्या कामावर शंका घेतली जाते : मुख्यमंत्री शिंदे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : समुद्रकिनारी बॉयफ्रेंडसोबत रोमाँटिक झाली 'तारक मेहता...'ची सोनू; गुडघ्यावर बसून केलं प्रपोज, लवकरच अडकणार लग्नबंधनात
समुद्रकिनारी बॉयफ्रेंडसोबत रोमाँटिक झाली 'तारक मेहता...'ची सोनू; गुडघ्यावर बसून केलं प्रपोज, लवकरच अडकणार लग्नबंधनात
Subodh Bhave :
"बदल घडवायचा असेल तर घराबाहेर पडा आणि मत द्या"; अभिनेता सुबोध भावेचं मतदारांना आवाहन
Allu Arjun : हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Nilesh Lanke On opponent : मतदारसंघात मतदानासाठी पैसे वाटप, लंकेचा विरोधकांवर आरोपRaosaheb Danve Jalna Vote :  पत्नीसह मतदान केंद्रात, रावसाहेब दानवेंनी बजावला मतदानाचा हक्कMurlidhar Mohol On Girish Bapat : गिरीश बापटांचं मताधिक्य मिळवण्याचा आमचा प्रयत्न : मोहोळMurlidhar Mohol Appeal voting : मतदानाचा हक्क बजावा, मुरलीधर मोहोळांकडून नागरिकांना आवाहन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : समुद्रकिनारी बॉयफ्रेंडसोबत रोमाँटिक झाली 'तारक मेहता...'ची सोनू; गुडघ्यावर बसून केलं प्रपोज, लवकरच अडकणार लग्नबंधनात
समुद्रकिनारी बॉयफ्रेंडसोबत रोमाँटिक झाली 'तारक मेहता...'ची सोनू; गुडघ्यावर बसून केलं प्रपोज, लवकरच अडकणार लग्नबंधनात
Subodh Bhave :
"बदल घडवायचा असेल तर घराबाहेर पडा आणि मत द्या"; अभिनेता सुबोध भावेचं मतदारांना आवाहन
Allu Arjun : हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट;  मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
Lok Sabha Election 4 Phase Voting : लोकसभेची रणधुमाळी : चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, असदुद्दीन ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Lok Sabha Election 4 Phase : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Lok Sabha Voting: छत्रपती संभाजीनगरमध्ये 25 ठिकाणी ईव्हीएम यंत्रं बिघडली, परळीतही ईव्हीएम सुरु होईना
मोठी बातमी: छत्रपती संभाजीनगरमध्ये 25 ठिकाणी ईव्हीएम यंत्रं बिघडली, परळीतही ईव्हीएम सुरु होईना
Shah Rukh Khan : शाहरुखची फेव्हरेट अभिनेत्री कोण? किंग खानने स्वत:चं केला खुलासा
शाहरुखची फेव्हरेट अभिनेत्री कोण? किंग खानने स्वत:चं केला खुलासा
Embed widget