एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तूरडाळीची लागवड करणाऱ्यांना हेक्टरी अनुदान देण्याचा विचार
नाशिक : तूरडाळीने पुन्हा एकदा 200 रुपयांचा टप्पा गाठल्यानंतर सरकारला जाग आली आहे. तूरडाळीची लागवड करणाऱ्यांना हेक्टरी अनुदान देण्याचा विचार सरकार करत आहे, असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी सांगितलं. ते नाशिकमध्ये बोलत होते.
डाळींचे दर कडाडले, तूरडाळ 200 रुपयांच्या घरात
पाऊस लांबल्याने तूरडाळ सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. डाळींचे दर गगनाला भिडले आहेत. शिवाय भारतात 70 टक्के तूरडाळ आयात होते. त्यामुळे तूरडाळ लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने हेक्टरी अनुदान देण्याचा विचारही सुरु केला आहे. याद्वारे डाळींच्या किंमती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न आहे. तसंच तूरडाळीचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement