एक्स्प्लोर

भाजप विधानसभेच्या तयारीला, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीच्या हालचाली

राज्य सरकारने आतापर्यंत राज्यातील 43 लाख 35 हजार शेतकऱ्यांना 18 हजार 235 कोटी रुपयांची कर्जमाफी दिली आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्याआधीच भाजप आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं दिसत आहे. फडणवीस सरकार लवकरच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याच्या विचारात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीआधी फडणवीस सरकार हे मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. थकबाकीदार शेतकरी आणि थकबाकीची माहिती जिल्ह्या-जिल्ह्यातून मागवण्यात आली आहे.  मार्च 2016-17 ते 2018 पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी करुन त्यांना मोठा दिलासा देण्याचे सरकारचे प्रयत्न असणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यभरात विकास यात्रा काढून जनतेशी संवादही साधणार आहेत. राज्य सरकारने आतापर्यंत राज्यातील 43 लाख 35 हजार शेतकऱ्यांना 18 हजार 235 कोटी रुपयांची कर्जमाफी दिली आहे. VIDEO | सरकार आल्यास 10 दिवसात राहुल गांधीकडून कर्जमाफी | मुंबई  संघटन मंत्र्यांची काल माझ्यासोबत बैठक झाली, आज कार्यकारिणीची बैठक होत आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली. दुष्काळासंदर्भातील मदत सर्व लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी कार्यकर्त्यांना आदेश दिले गेले आहेत. दोन वर्षांपासून जशी लोकसभेची तयारी सुरु केली त्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केल्याचंही ते म्हणाले. पाच वर्षात सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, असं यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. पात्रधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी सुरुच राहील, असंही रावसाहेब दानवेंनी सांगितलं. विविध वाहिन्या आणि संस्थांच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान होण्याची शक्यता बहुतांश एक्झिट पोलमध्ये दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
Manoj Jarange Patil: 'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा
'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget