एक्स्प्लोर

राज्यातील 3 टोलनाक्यांवर 29 वर्ष वसुली सुरुच राहणार

मुंबई : नवीन पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना निधी उभारण्यासाठी राज्य सरकारने 3 टोलनाक्यांवर वसुलीचा कार्यकाळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये वांद्रे-वरळी सी लिंक, वाशी आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे या टोलनाक्यांचा समावेश आहे. या टोलनाक्यावर पुढील 29 वर्षे टोलवसुली सुरुच राहणार आहे. वांद्रे-वर्सोवा सी-लिंकच्या कामासाठी, वांद्रे-वरळी सी लिंकचा टोल 2068 पर्यंत खुला राहणार आहे. खाडीवरील पुलाच्या रुंदीकरणासाठी वाशी टोलनाक्यावर 2038 पर्यंत तर लोणावळा-खंडाळा भुयारी मार्गाच्या कामासाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील टोल वसुली 2045 पर्यंत सुरु राहणार आहे. पायाभूत सुविधांसाठी नेमण्यात आलेल्या उपसमितीने एमएसआरडीला अतिरिक्त टोल वसुलीची परवानगी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या उपसमितीचे प्रमुख आहेत. याशिवाय मुंब्रा बायपास (शिळफाटा) ते कल्याणपासून नाशिक महामार्गापर्यंतच्या 30 किमी रस्त्याच्या सहा पदरीकरणालाही मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे नागरिकांना 2016 मध्ये बंद केलेल्या टोलनाक्यांवरही टोल द्यावे लागणार आहे. प्रकल्पांचं 70 टक्के काम पूर्ण झाल्यास टोलवसुली सुरु होईल. 16 किमीच्या टनेल एक्स्प्रेस बायपाससाठी 4800 कोटी रुपये, 12 पदरी वाशी खाडीवरील पुलाच्या रुंदीकरणासाठी 777 कोटी रुपये आणि वांद्रे-वर्सोवा सी लिंकसाठी 7502 रुपये खर्च अपेक्षित आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  

Marathi Serial Updates Zee Marathi :  'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या'  अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या' अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 

गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला! शिंदे गटाकडून निरोप, नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला! शिंदे गटाकडून निरोप, नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Aaditya Thackeray Majha Vision : Eknath Khadse यांचा फोन आला...म्हणाले,Aaditya Thackeray Majha Vision : खिचडीचा घोटाळा झाला की नाही? आदित्य ठाकरे म्हणतात... ABP MajhaAaditya Thackeray Majha Vision : आम्ही बोलायचो ते भाजपला टोचायचं, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल...ABP Majha Headlines : 05 PM : 14 May  2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
Marathi Serial Updates Zee Marathi :  'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या'  अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या' अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला! शिंदे गटाकडून निरोप, नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला! शिंदे गटाकडून निरोप, नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
घरी मुलीच्या लग्नाची तयारी अन् पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू

3 जागा, 6 संघ... प्लेऑफची स्पर्धा रंजक; CSK, RCB की SRH कुणाची वर्णी? पाहा नेमकं समीकरण

प्लेऑफमध्ये कोणते संघ, चेन्नई की आरसीबीला स्थान मिळणार, भज्जी-कैफनं कुणाला दिली पसंती? 

Kartiki Gaikwad Pregnancy News :  'लिटिल चॅम्प'च्या घरी इवलुशा पावलांनी आला पाहुणा; कार्तिकी-रोनित झाले आई-बाबा
'लिटिल चॅम्प'च्या घरी इवलुशा पावलांनी आला पाहुणा; कार्तिकी-रोनित झाले आई-बाबा
Embed widget