एक्स्प्लोर
प्रकाश मेहतांसह तिघांना मंत्रिमंडळातून डच्चू, आशिष शेलार, योगेश सागर, अतुल सावेंसह 'या' 12 नावावर शिक्कामोर्तब
भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील, सुरेश खाडे, आशिष शेलार, योगेश सागर, अनिल बोंडे, संजय कुटे, बाळा भेगडे, परिणय फुके, अतुल सावे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे.
![प्रकाश मेहतांसह तिघांना मंत्रिमंडळातून डच्चू, आशिष शेलार, योगेश सागर, अतुल सावेंसह 'या' 12 नावावर शिक्कामोर्तब state cabinet expansion on sunday in, prakash mehta out ashish shelar, radhakrishna vikhe and othe 13 in प्रकाश मेहतांसह तिघांना मंत्रिमंडळातून डच्चू, आशिष शेलार, योगेश सागर, अतुल सावेंसह 'या' 12 नावावर शिक्कामोर्तब](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/03/07075024/Mantralaya_CM.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला असून सकाळी 11 वाजता विस्तारीत राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. या मंत्रिमंडळात नव्या 12 मंत्र्यांचा समावेश होणार आहे. तर दुसरीकडे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यासह राजकुमार बडोले आणि दिलीप कांबळे यांनाही डच्चू मिळण्याची शक्यता आहे.
भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील, सुरेश खाडे, आशिष शेलार, योगेश सागर, अनिल बोंडे, संजय कुटे, बाळा भेगडे, परिणय फुके, अतुल सावे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराचा नवा फॉर्म्युला 10+2+1 असा असणार आहे. भाजपला 10, शिवसेनेला 2 तर रिपाइंला एक अशी मंत्रिपदं देण्यात येणार आहेत.
रिपाइंच्या कोट्यातून अविनाश महातेकर, शिवसेनेकडून नुकतेच सहभागी झालेले जयदत्त क्षीरसागर, तानाजी सावंत यांनाही मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळात नवीन सदस्यांचा समावेश करुन त्यांना शपथ देण्याचा समारंभ उद्या, 16 जून 2019 रोजी सकाळी 11 वाजता, राजभवन, मलबार हिल, मुंबई येथे करण्याचे नियोजित करण्यात आला आहे.
या नेत्यांना मंत्रिपदाची लॉटरी
1. राधाकृष्ण विखे पाटील (भाजप) संभावित कॅबिनेट
2. डॉ. संजय कुटे (भाजप) संभावित राज्यमंत्री
3. सुरेश खाडे (भाजप) संभावित कॅबिनेट
4. योगेश सागर (भाजप) संभावित राज्यमंत्री
5. डॉ. अनिल बोंडे (भाजप) संभावित राज्यमंत्री
6. अतुल सावे (भाजप) संभावित राज्यमंत्री
7. जयदत्त क्षीरसागर (शिवसेना) संभावित कॅबिनेट
8. आशिष शेलार (भाजप) संभावित कॅबिनेट
9. तानाजी सावंत (शिवसेना) संभावित राज्यमंत्री
10. परिणय फुके (भाजप) संभावित राज्यमंत्री
11. अविनाश महातेकर (रिपाइं) संभावित राज्यमंत्री
12. बाळा भेगडे (भाजप) संभावित राज्यमंत्री
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
पुणे
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)