एक्स्प्लोर

वकिलांना प्रायोगिक तत्वावर रेल्वेनं प्रवास करण्याची परवानगी, राज्य सरकारची हायकोर्टात माहिती

सध्या प्रायोगिक तत्वावर 18 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबरपर्यंत प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा हायकोर्टातील वकिलांसाठी सुरू राहणार आहे.

मुंबई : लॉकडाऊन कालावधीमध्ये सुनावणीसाठी न्यायालयात हजेरी लावणा-या वकिलांना आता प्रायोगिक तत्वावर रेल्वेनं प्रवास करण्याची सशर्त मुभा देण्यास तयार असल्याचं राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं. त्यामुळे आता ज्या वकिलांना प्रत्यक्ष सुनावणीला हजेरी लावायची असेल त्यांना हायकोर्टाच्या रजिस्ट्रार कार्यालयातून तसं प्रमाणपत्र घेऊन रेल्वेनं प्रवास करता येणार आहे. त्यामुळे सध्या प्रायोगिक तत्वावर 18 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबरपर्यंत प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा हायकोर्टातील वकिलांसाठी सुरू राहणार आहे. त्यानंतर अन्य कनिष्ठ न्यायालयांसाठी याचा विचार करु, असं हायकोर्टानं स्पष्ट केलं आहे.

मुंबई उच्च न्यायालयासह इतर न्यायालयांचं प्रत्यक्ष कामकाज हळूहळू सुरू झालं आहे. त्यामुळे वकिलांना न्यायालयात हजेरी लावाणं क्रमप्राप्त आहे. याच पार्श्वभूमीवर रेल्वेतून वकिलांना प्रवास करायला परवानगी द्यावी अशी मागणी करणारी जनहित याचिका अॅड. उदय वारुंजीकर आणि अॅड. शाम देवानी यांच्यामार्फत हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर मंगळवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी पार पडली. ज्यात ज्या वकिलांना प्रत्यक्ष सुनावणीला हजेरी लावायची असेल त्यांनी रजिस्ट्रार कार्यालयात अर्ज द्यावा, त्यावर रजिस्ट्रारकडून ईमेलवर प्रमाणपत्र पाठविले जाईल. या पत्रावर संबंधित वकिलांना त्या दिवसाचं तिकीट काढता येईल, असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. ज्यांना पत्र मिळालं असेल त्यांनाच रेल्वेनं त्या विशिष्ट दिवसाचे तिकिट द्यावं, असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तसेच याचा गैरवापर वकिलांनी करु नये आणि तसं केल्यास बार कौन्सिल महाराष्ट्र आणि गोवामार्फत त्यांच्यावर कारवाई केली जाईल असंही न्यायालयानं म्हटलं आहे.

याआधी न्यायालयाने वकिलांसाठी ई पासबाबत सरकारकडे विचारणा केली होती. त्यावर महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी खंडपीठापुढे राज्य सरकारची बाजू मांडली. राज्य सरकार परवानगी यासाठी देईल मात्र त्यासाठी नियोजन आवश्यक आहे, असे त्यांनी कोर्टाला सांगितलं होतं. रेल्वे सेवा नसल्यामुळे न्यायालयात पोहचण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत, अशी तक्रार सातत्यानं वकिलांकडून होत होती. त्यामुळे हायकोर्टाच्या या निर्णयामुळे अनेक वकिलांना त्याचा फायदा होणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget