शासनात विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कामगार आक्रमक; पुन्हा मोठा संघर्ष उभारण्याच्या तयारीत
शासनात विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कामगार पुन्हा आक्रमक झाले आहेत. त्यामुळे एसटी कामगार पुन्हा मोठा संघर्ष उभारण्याच्या तयारीत आहेत.

परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक (Pratap sarnaik) यांच्या निर्देशानुसार सुनियोजन व निर्णयाचे विकेंद्रीकरण करण्याच्या हेतूने कर्नाटक परिवहन महामंडळ धर्तीवर एसटी महामंडळातंर्गत 5 प्रादेशिक विभागांची निर्मिती करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी करण्याचे परिपत्रक नुकतेच एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी काढलं आहे. पुढील काही दिवसात ST महामंडळाचे (ST) हे प्रादेशिक विभाग स्वतंत्रपणे आपले कार्यालय सुरू करतील.
सत्ताधारी पक्षातील संघटनांनी नेतृत्व करण्याची केली विनंती
दरम्यान, या निर्णयानंतर आता एसटी कामगारांनी आपली जुनी मागणी पुढे केली असून शासन विलीनीकरणासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शासनात विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कामगार पुन्हा आक्रमक झाले आहेत. त्यामुळे एसटी कामगार पुन्हा मोठा संघर्ष उभारण्याच्या तयारीत आहेत. या लढ्याला व्यापक स्वरुप देण्यासाठी संघर्ष समितीच्या माध्यमातून पुन्हा एकत्र येण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. यासाठी एसटी कामगार सेनेने विविध २४ संघटनांना पत्र लिहून विलीनीकरणासाठी भूमिका मांडली आहे. दरम्यान, सत्ताधारी पक्षातील संघटनांनी नेतृत्व करण्याची विनंती केली आहे.
एसटी कामगारांच्या प्रमुख मागण्या काय?
- एसटी कामगारांना 2016 पासून 1 टक्के वार्षिक वेतनवाढ व 1 टक्के घरभाडे भत्ता द्या
- 2018 पासुन जवळपास 7 वर्षांचा टप्प्याटप्प्याने वाढत गेलेल्या महागाई भत्त्याचा फरक द्या
- 1 एप्रिल 2020 पासुन 31 मार्च 2024 पर्यंत 6500 रुपये वेतन वाढीचा 4 वर्षाचा प्रलंबित फरक द्या
- शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्त्याचा दर 25 टक्के ओलांडल्यावर घरभाडे भत्ता अनुक्रमे 9 टक्के, 18 टक्के व 27 टक्के दराने द्यावा
- महागाई भत्त्याचा दर 50 टक्के झाल्यावर घरभाडे भत्त्याचा दर अनुक्रमे 10 टक्के, 20 टक्के, 30 टक्के दराने द्यावा
दरम्यान, प्रादेशिक विभागानुसार एसटी महामंडळाचे मुंबई, नाशिक, नागपूर, पुणे व अमरावती असे 5 प्रादेशिक विभाग करण्यात आले आहेत. प्रत्येक प्रादेशिक विभाग अंतर्गत कार्यरत विभाग व मुख्यालय निश्चित करण्यात आले आहेत. प्रत्येक समितीसाठी आवश्यक तेवढ्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून, त्या-त्या भागातील प्रवाशांना अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि वेळेत सेवा मिळण्यासाठी सर्व प्रकारचे नियोजन राबवले जाणार आहे. उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती अंमलबजावणी तातडीने सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या

























