एक्स्प्लोर

राज्यात अडकलेल्या लोकांसाठी 'या' अटींसह एसटीचा प्रवास शक्य

राज्यात अडकलेल्या लोकांना गावी परत जाण्यासाठी एसटीतर्फे मोफत बस सेवा सुरु होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. येत्या 18 मेपर्यंतच ही सेवा असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मुंबई : लॉकडाऊनमुळे राज्यात विविध ठिकाणी अडकलेल्या लोकांना आणि विद्यार्थ्यांना गावी परतण्यासाठी एसटीतर्फे मोफत सेवा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. एसटीच्या माध्यमातून कोरोनाचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी काही अटी आणि शर्तींसह परवानगी देण्यात आली आहे. यासाठी 21 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बाबी :

1. फिजीकल डिस्टनसिंग नियमानुसार प्रत्येक सीटवर एक प्रवासी यामुळे एका बसमध्ये साधारणपणे 21 ते 22 लोक बसू शकतात. त्यामुळे जर 21-22 लोकांचा एक ग्रुप तयार झाला, तर त्या ग्रुपने आपल्या ग्रुप लिडरच्या नावासह, सर्वांची नावे, संपूर्ण पत्ता, जिथे जायचे आहे तेथील पत्ता, आधार कार्ड नंबर असा फॉर्म भरुन शहरी भागामध्ये पोलीस आयुक्त कार्यालय व ग्रामीण भागामध्ये जिल्हाधिकारी, तहसीलदारांकडे जमा करावीत. ज्या जिल्ह्यामध्ये ते जाणार आहेत, त्या जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आल्यानंतर त्यांना एस. टी. कधी व कोठून जाणार आहे याबद्दलची माहिती कळविण्यात येईल.

2 . जे नागरिक वैयक्तिक जाऊ इच्छितात त्यांनी एस. टी. महामंडळाने तयार केलेल्या ऑनलाईन पोर्टलद्वारे नाव नोंदणी करायची आहे. हे पोर्टल सोमवार पासून चालू होईल. ऑनलाईन अर्ज करतेवेळी, आपण सध्या ज्या जिल्ह्यात वास्तव्य करत आहात, त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांची परवानगी जोडणे आवश्यक आहे.

3. या प्रवासादरम्यान प्रवाशांनी मास्क घालणे, बसमध्ये चढतेवेळी हात सॅनिटायझरने स्वच्छ करणारे बंधनकारक आहे. बस निघण्यापूर्वी व पोहचल्यानंतर सॅनिटाईज केली जाईल.

4. ज्या जिल्ह्यांमध्ये हे प्रवासी जाणार आहेत तिथे त्यांची तपासणी करून संस्थात्मक किंवा घरीच विलगीकरण करण्याचे अधिकारी त्या नोडल अधिकारी यांच्याकडे असतील.

5. ही पॉईंट टू पॉईंट सेवा आहे. प्रवासात मध्येच कुठे प्रवासी उतरणार नाही किंवा चढणार नाहीत. लांब पल्याच्या गाड्या कुठेही जेवणासाठी थांबणार नाहीत. त्यामुळे आपले अन्नपाणी घरूनच घेऊन यावे, तसेच फक्त सॅनिटाईज केलेली महामंडळाचीच प्रसाधनगृहे वापरली जातील.

6. कन्टेन्मेंट झोन मधील नागरिकांना कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. ही सुविधा फक्त लॉकडाऊन संपेपर्यंतच असणार आहे. त्यामुळे पोलीस कार्यालयांमध्ये, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, बस स्टॅन्ड किंवा रस्त्यावर गर्दी करू नये.

7.ज्या मार्गावरून एसटी धावणार त्या मार्गावर जर कोणी मजूर, विद्यार्थी ,विस्थापित चालत असतील तर त्यांना बसमध्ये जागा असल्यास आणि बस मध्ये जागा असल्यास आणि जिथे बस जाणार तिथेच त्यांना जायचं असेल तर त्यांना बसमध्ये घेऊन त्यामार्गावर सोडण्यात येईल.

Free ST Service | एसटीने मोफत प्रवास करण्यासाठीच्या फॉर्मबद्दल परिवहन मंत्री सतेज पाटील यांची माहिती

महत्त्वाच्या बातम्या

Nandurbar Crime News: नंदुरबार हादरले! तब्बल 51 बालकांसोबत नको ते कृत्य, 22 वर्षीय तरुणाला बेड्या, चार वर्षांपासून सुरू होता धक्कादायक प्रकार
नंदुरबार हादरले! तब्बल 51 बालकांसोबत नको ते कृत्य, 22 वर्षीय तरुणाला बेड्या, चार वर्षांपासून सुरू होता धक्कादायक प्रकार
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Babanrao Taywade on Manoj Jarange Patil: तर मग हा खटाटोप कशाला? राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा मनोज जरांगेंना रोखठोक सवाल, आंदोलनावरून राज्य सरकारलाही थेट इशारा
तर मग हा खटाटोप कशाला? राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा मनोज जरांगेंना रोखठोक सवाल, आंदोलनावरून राज्य सरकारलाही थेट इशारा
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
Embed widget