एक्स्प्लोर

एसटी परीक्षेचा निकाल जाहीर, एसटीची स्टेअरिंग अनेक महिलांच्या हाती येणार

परीक्षेला बसलेल्या 35 हजार 463 उमेदवारांपैकी 30 हजार 68 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमध्ये तब्बल 742 महिलांचा समावेश आहे. सदर निकाल महामंडळाच्या www.msrtc.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

धुळे :  एसटी तर्फे चालक तथा वाहक पदासाठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेला बसलेल्या 35 हजार 463 उमेदवारांपैकी 30 हजार 68 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमध्ये तब्बल 742 महिलांचा समावेश आहे. सदर निकाल महामंडळाच्या www.msrtc.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची प्रमाणपत्र  व शारिरीक उंची  व अन्य अहर्तासंबंधीची तपासणी झाल्यानंतर 100 गुणांची संगणकीकृत वाहन चालन चाचणी होणार आहे. या चाचणीचे गुण व लेखी परीक्षेचे गुण एकत्रित करुन अंतिम निकाल जाहीर करण्यात येईल. तसेच ज्या महिला उमेदवार उत्तीर्ण झाल्या आहेत, त्यांची केवळ शारीरिक उंची व अन्य   अहर्तासंबंधीच्या प्रमाणपत्राची पडताळणी होऊन त्यांना एसटीतर्फे एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी निवडले जाणार आहे, अशी माहिती एसटी प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे. एसटी महामंडळाच्या चालक तथा वाहक पदाच्या भरतीसाठी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. विशेष म्हणजे यावेळी एसटी चालक पदासाठी तब्बल 900 महिलांनी अर्ज केला होता.   आतापर्यंत एसटी महामंडळात एकही महिला चालक नाहीये. या भरतीनंतर महाराष्ट्रभरात महिला कंडक्टरसोबत महिला ड्रायव्हरदेखील प्रवाशांच्या सेवेला येणार आहेत. या भरती प्रक्रियेत लेखी परीक्षा आणि तांत्रिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर या महिला चालक एसटी महामंडळाच्या सेवेत दाखल होणार आहेत. महामंडळाने महिलांसाठीच्या अटी शर्तींमध्ये देखील शिथिलता आणली आहे. दुष्काळग्रस्त 12 जिल्ह्यांसह एकूण 21 जिल्ह्यांमध्ये एसटी महामंडळाच्या 8022 चालक तथा वाहक पदांच्या भरतीसाठी राज्यभरातून सुमारे 42 हजार अर्ज प्राप्त झाले होते. त्यामध्ये महिला उमेदवारांचे 932 अर्ज प्राप्त झाले होते. महामंडळाने आदिवासी उमेदवारांसाठी राबविलेल्या विशेष प्रचार मोहिमेमुळे अनुसूचित जमातीच्या 685 पदांसाठी 2406 अर्ज दाखल झाले होते.

महत्त्वाच्या बातम्या

फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
Rohit Pawar: MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवार अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात; तुकाराम मुंढे काय म्हणाले?
MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवार अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात; तुकाराम मुंढे काय म्हणाले?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
NEET Paper Leak: नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिल्या सुनावणीत काय घडलं? सुनावणी थेट 3 ऑगस्टला होणार,नेमकं कारण काय?
नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिली सुनावणी लांबणीवर, नेमकं कारण काय?
Indigo Flight Emergency Landing: दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
Cockroach Janata Party: तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
Embed widget