एक्स्प्लोर

ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट?, अजय गुजर यांच्या माघार घेण्याने संपकरी आक्रमक

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाने नवं वळण घेतलं आहे. महाराष्ट्र राज्य कनिष्ट श्रेणी संघटनेने संपातून माघार घेतल्याचं जाहीर केल्यामुळे अनेक संपकरी आक्रमक झाले असून संपात फूट पडल्याची चर्चाही होत आहे.

ST Strike Update : मागील जवळपास दोन महिन्यांपासून सुरु असलेला राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही थांबण्याचं नाव घेत नाही. त्यात या संपाने आज नवं वळण घेतलं आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ट श्रेणी संघटनेनं सोमवारी (20 डिसेंबर) मंत्रालयात परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत बैठक घेतली. ज्यानंतर संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर यांनी त्यांच्याकडून एसटी संप मागे घेतल्याचे जाहीरही केले. पण एसटी विलगीकरणाच्या मागणीच्या पूर्ततेशिवाय माघार घेतल्याने इतर संपकरी आक्रमक झाले असून हा संप अजूनही मागे घेतली नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. दरम्यान गुजर यांनी संपातून माघार घेतल्याने संपात फूट पडल्याच्या चर्चेलाही उधान आलं आहे. 

मंत्रालयात झालेल्या बैठकीत अनिल परब यांच्यासह महाराष्ट्र राज्य कनिष्ट श्रेणी संघटनेचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, महा व्यवस्थापक माधव काळे आणि अध्यक्ष अजय गुजर हे उपस्थित होते. दरम्य़ान जवळपास सहा तास चाललेल्या बैठकीनंतर परब यांनी दिलेल्या माहितीत, चर्चेतून प्रश्न सुटतील असं सांगत संप माग घेण्याचं आवाहन केलं. त्यानंतर महाराष्ट्र राज्य कनिष्ट श्रेणी संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर यांनी त्यांच्याकडून संप मागे घेतल्याचे जाहीर केले. शिवाय विलनीकरणाच्या मुद्द्यावर आम्ही ठाम असून याबाबत राज्यसरकारशी चर्चा करणार असल्याचंही ते म्हणाले.

संपकरी आक्रमक

दरम्यान गुजर यांच्या संपातून माघार घेण्यानंतर आझाद मैदानात उपस्थित अनेक संपकऱ्यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिल्या. यावेळी विलणीकरणाच्या मुद्द्याशिवाय संप मागे घेणार नाही. या एकमेव मागणीवर ठाम असल्य़ांचं अनेकांनी सांगतिलं. तसंच एका संतप्त महिला आंदोलकाने एक लाख संपकऱ्यांचा जीव गेला तरी आम्ही दुखवटा चालूच ठेवू असंही म्हटंल आहे. 

अनिल परब काय म्हणाले?

चर्चेनंतर अनिल परब यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत ते म्हणाले, 'ज्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे, ते कर्मचारी जर कामावर पुन्हा रूजू झाले तर त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्यात येईल. तसंच फौजदारी गुन्हे ज्यांच्यावर दाखल झाले आहेत त्यांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कारवाई मागे घेण्यात येणार आहे. शिवाय आत्महत्याग्रस्त कर्मचाऱ्यांची सर्व प्रकरणे तपासून त्याचा अहवाल तयार करुन त्यांच्या वारसांना नोकरी देण्याबाबत विचार केला जाणार आहे. 22 डिसेंबरपर्यंत  कर्मचाऱ्यांनी कामावर दाखल व्हावं, ज्या कर्मचाऱ्यांना कामावर येण्यास बाहेरगावी असल्यानं उशीर होईल त्यांना एक दिवसाची सवलत देण्यात येईल. दरम्यान कर्मचाऱ्यांनी कामावर यावं चर्चेतून प्रश्न सुटू शकतात.'

सदावर्ते आंदोलनावर ठाम

एकीकडे कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर यांनी संप मागे घेतल्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे अॅड. गुणरत्ने सदावर्ते हे आंदोलनावर ठाम आहेत. विलिनीकरणाची मान्य झाल्याशिवाय हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही अशी भूमिका सदावर्तेंनी घेतली आहे. त्यावर बोलताना अजय गुजर म्हणाले की, "आम्ही विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहोत, पण समितीच्या निर्णयाची वाट पाहत आहोत. गुणरत्न सदावर्ते हे आमचे वकील आहेत. जर त्यांना आमची भूमिका मान्य नसेल, त्यांना आमची केस लढायची नसेल तर आम्ही दुसरा वकील बघू." दरम्यान याआधी कोर्टात सुनावणीदरम्यान 'अजय गुजर यांची किमान वेतन श्रेणी एसटी कामगार संघटना नोंदणीकृत आहे मात्र मान्यताप्राप्त नाही. शिवाय याचे केवळ दोन सदस्य आहेत.' अशी माहिती कोर्टात सदावर्ते यांनी दिली होती.

संबंधित बातम्या : 

 

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget