एक्स्प्लोर

पगार न मिळाल्याने दोन एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या, संघटना आक्रमक

मागील 3 महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं असताना वेतन न मिळाल्याच्या विवंचनेतून दोन एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. जळगाव आणि रत्नागिरीतील दोन एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Worker Suicide) आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.

जळगाव/रत्नागिरी : मागील 3 महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं असताना वेतन न मिळाल्याच्या विवंचनेतून दोन एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. जळगाव आणि रत्नागिरीतील दोन एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. जळगाव येथील वाहक मनोज चौधरी यांनी मागील 3 महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे  कंटाळून आत्महत्या केली. या घटनेने संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी जळगाव डेपो बंद ठेवत निषेध केला आहे. तर रत्नागिरी येथे पांडुरंग गदडे या एसटी कर्मचाऱ्याचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर ही हत्या असल्याचा आरोप नातेवाईकांकडून केला जात आहे.

जळगावच्या मनोज चौधरींची आत्महत्या, ठाकरे सरकारला धरलं जबाबदार कोरोनाच्या काळा पासून एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेकांना चार महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने अनेकांची आर्थिक परिस्थिती ढासळली असल्याचं पाहायला मिळत आहे. वेतन न मिळाल्यानं जळगाव जिल्ह्यातील रायपूर कुसुम्बा गावातील रहिवासी आणि जळगाव एसटी महामंडळात वाहक पदावर काम करत असलेल्या मनोज चौधरी यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मृत्यूपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठीत एस टी महामंडळ आणि ठाकरे सरकार जबाबदार असल्याचं सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.

रत्नागिरीत एसटी कर्मचाऱ्याचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला रत्नागिरी येथे एसटी कर्मचाऱ्याचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर ही हत्या असल्याचा आरोप नातेवाईकांकडून केला जात आहे. पण, ज्या अवस्थेत मृतदेह आढळून आला ती परिस्थिती पाहता ही आत्महत्या असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. शिवाय, या ठिकाणची परिस्थिती देखील त्यास दुजोरा देणारी अशीच आहे. ज्यावेळी दरवाजा उघडण्यास आला त्यावेळी तो आतून बंद होता. त्यामुळे ही हत्या असल्याचं म्हणू शकत नाही, असं पोलिसांचं मत आहे. पण, यामागील ही हत्या की आत्महत्या हे पोस्टमॉर्टम झाल्यानंतर स्पष्ट होईल. सध्या पांडुरंग गदडे यांचे नातेवाईक बीड येथून निघाले असून त्यानंतरच पोस्टमॉर्टम केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पांडुरंग गडदे यांचा आत्महत्या केल्यानंतरचा फोटो समोर आला आहे. यामध्ये त्यांच्या अंगावर कोणत्याही स्वरूपाचा कपडा नाही. विवस्त्र अवस्थेमध्ये लटकलेला मृतदेह लटकलेल्या स्वरूपामध्ये समोर आल्याने ही हत्या आहे की आत्महत्या याची चर्चा सुरू आहे. दरम्यान ही आत्महत्या नसून त्याची हत्या असल्याचा आरोप पांडुरंग गडदेंच्या वडिलांनी केला आहे

एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला राज्य सरकार जबाबदार-  रावसाहेब दानवे दिवाळीत बोनस तर सोडाच पण पगारही नाही ही गंभीर बाब आहे.  केंद्राने जसं पॅकेज दिलं राज्याने तसं पॅकेज दिलं असते तर अशी वेळ आली नसती. या एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला सरकार जबाबदार आहे, असा आरोप केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या तीन महिन्यांच्या थकीत वेतनासाठी एसटी कामगार संघटनेचं राज्यभर आक्रोश आंदोलन

ST कर्मचाऱ्यांचे आंदोलन चंद्रपूर : दिवाळी तोंडावर आली असतांना देखील ST कर्मचाऱ्यांचे 4 महिन्यांपासून पगार झालेले नाहीत. त्यातच या कर्मचाऱ्यांना आता अत्यावश्यक सेवेत सामील केल्यामुळे त्यांच्या आंदोलन करण्यावर देखील बंधनं आली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी आजपासून आपल्या घरासमोर बसूनच आंदोलन करण्याला सुरुवात केली आहे.

संघटनेचं राज्यभर आक्रोश आंदोलन एसटीच्या एक लाख 10 हजार कर्मचाऱ्यांच्या तीन महिन्यांच्या थकीत वेतनासाठी एसटी कामगार संघटनेनं आज राज्यभर आक्रोश आंदोलन पुकारलं आहे.  या आंदोलनात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे पत्रक एसटी प्रशासनाने जारी केलं आहे. दरम्यान, कामगार करार आणि वेतन प्रदान कायद्याचा भंग केल्याबाबत औद्योगिक न्यायालयात दावा ठोकणार असल्याचा इशारा एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिला आहे. तर दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन मिळावे, थकीत तीन महिन्याचे वेतन मिळावं यासाठी इंटक ने एसटी प्रशासना विरोधात कायदेशीर लढाई सुरू केलीय.

कामगार व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ कोरोनाच्या आपत्ती काळात सोयी-सुविधांचा अभाव असतानाही एसटी कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून अत्यावश्यक सेवा बजावत आहेत. तसेच सध्या मुंबई बेस्टची बस वाहतूकही एसटी कर्मचारी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत करीत आहेत. यामध्ये एसटी महामंडळाचे बरेचसे कर्मचारी कोरोना बाधित झालेले असून सुमारे 73 कर्मचारी मृत झालेले आहेत. कोरोना कालावधीमध्ये कामगार प्रतिकूल परिस्थितीत काम करीत असताना, कामगारांना माहे ऑगस्ट 2020 पासून वेतन दिले नाही. त्यामुळे कामगार व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh Case: 'निवडणुका झाल्याने मी आता मोकळा झालोय....' संतोष देशमुखांना मारण्यापूर्वी वाल्मिक कराडने फोनवरुन कोणाला फर्मान सोडलं?
'निवडणुका झाल्याने मी मोकळा झालोय....' संतोष देशमुखांना मारण्यापूर्वी वाल्मिक कराडने फोनवरुन कोणाला फर्मान सोडलं?
सावरकर, गोळवलकरांनी संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण केलं, भाजपची ही किडे प्रवृत्ती: हर्षवर्धन सपकाळ
सावरकर, गोळवलकरांनी संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण केलं, भाजपची ही किडे प्रवृत्ती: हर्षवर्धन सपकाळ
काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
Santosh Deshmukh : सीआयडीने केदारच्या फोनचं स्क्रीन लॉक उघडताच क्रौर्याची परिसीमा गाठणारे 15 व्हिडिओ, 8 फोटो सापडले
सीआयडीनं केदारच्या फोनचं स्क्रीन लॉक काढलं अन् क्रौर्याची परिसीमा गाठणारे 15 व्हिडिओ, 8 फोटो सापडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 Headlines : टॉप शंभर हेडलाईन्स : 6 AM : 04 March 2025 : ABP MajhaABP Majha Headlines | एबीपी माझा हेडलाईन्स | 6.30 AM | 4 March 2025 | ABP MajhaDevendra Fadnavis Ajit Pawar Meeting : Dhananjay Munde यांचा राजीनामा? फडणवीस-पवारांमध्ये बैठकAnjali Damaniya on Santosh Deshmukh:संतोष देशमुखांच्या हत्येचे क्रूर फोटो,अंजली दमानियांचा कंठ दाटला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh Case: 'निवडणुका झाल्याने मी आता मोकळा झालोय....' संतोष देशमुखांना मारण्यापूर्वी वाल्मिक कराडने फोनवरुन कोणाला फर्मान सोडलं?
'निवडणुका झाल्याने मी मोकळा झालोय....' संतोष देशमुखांना मारण्यापूर्वी वाल्मिक कराडने फोनवरुन कोणाला फर्मान सोडलं?
सावरकर, गोळवलकरांनी संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण केलं, भाजपची ही किडे प्रवृत्ती: हर्षवर्धन सपकाळ
सावरकर, गोळवलकरांनी संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण केलं, भाजपची ही किडे प्रवृत्ती: हर्षवर्धन सपकाळ
काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
Santosh Deshmukh : सीआयडीने केदारच्या फोनचं स्क्रीन लॉक उघडताच क्रौर्याची परिसीमा गाठणारे 15 व्हिडिओ, 8 फोटो सापडले
सीआयडीनं केदारच्या फोनचं स्क्रीन लॉक काढलं अन् क्रौर्याची परिसीमा गाठणारे 15 व्हिडिओ, 8 फोटो सापडले
Chhaava Box Office Collection Day 18: 'छावा'ची घौडदौड मंदावली,  सिंगल डिजीटमध्ये कमाई; तरीसुद्धा 'बाहुबली 2', 'अ‍ॅनीमल'वर मात
'छावा'ची घौडदौड मंदावली, सिंगल डिजीटमध्ये कमाई; तरीसुद्धा 'बाहुबली 2', 'अ‍ॅनीमल'वर मात
Accident News: ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?
दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?
धनंजय मुंडेंचा राजीनामा अटळ? अजित पवार अन् देवेंद्र फडणवीसांसोबत रात्री दोन तास बैठक, देवगिरी बंगल्यावर काय घडलं?
धनंजय मुंडेंचा राजीनामा अटळ? अजित पवार अन् देवेंद्र फडणवीसांसोबत रात्री दोन तास बैठक
Embed widget