एक्स्प्लोर

Majha Exclusive : 'लालपरी'चा प्रवास होणार स्वस्त; ईव्ही गाड्यांचे भाडे कमी करण्याबाबत लवकरच होणार निर्णय

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या या गाड्यांचे भाडे कमी असणार आहे. कारण याबाबतची तयारी सुरू झाली आहे. या संदर्भात राज्य सरकारडून एक समिती स्थापन करण्यात आली आहे.

मुंबई: देशभरातल्या पेट्रोलच्या वाढलेल्या किंमती पाहता नागरिक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. सरकार नागरिकांना इलेक्ट्रिक वाहनं घेण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.एसटीच्या ताफ्यात देखील पाच हजार ई-बसेस (E- Buses) दाखल होणार आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (ST) ताफ्यात दाखल होणाऱ्या या गाड्यांचे भाडे कमी असणार आहे. कारण याबाबतची तयारी सुरू झाली आहे. या संदर्भात राज्य सरकारडून एक समिती स्थापन करण्यात आली आहे.  लवकरच ही समिती बसगाड्यांचे प्रवास भाडे कमी करण्यासंदर्भातला निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती एबीपी माझाला मिळाली आहे. ई बसचे भाडे कमी होणार असल्याने प्रवाशांना स्वस्त दरात आरामदायी प्रवास करायला मिळणार आहे.

राज्य सरकारकडून समिती स्थापन

दिवसेंदिवस इंधनाचे वाढते दर, वाहनांमुळे वाढणारे प्रदूषण रोखण्यासाठी तसेच प्रवाशांना चांगली वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने एसटीच्या ताफ्यात विद्युत प्रणालीवर धावणाऱ्या इलेक्ट्रिक बस दाखल करण्यात आल्या आहे.  एसटी महामंडळाकडून ईव्ही गाड्यांच्या प्रवास भाडेसंदर्भात राज्य सरकारला समिती बनवण्याची शिफारस करण्यात आली.  राज्य सरकारकडून समिती स्थापन करत ईव्ही बसगाड्यांचे प्रवास भाडे कमी करण्यासंदर्भातला निर्णय होणार आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात पाच हजार ईव्ही गाड्या येत्या काही वर्षात दाखल होणार आहे. ईव्ही बसगाड्या दाखल होत असताना त्याचे प्रवास भाडे किती असेल असा प्रश्न होता, त्यात यासंदर्भात समितीकडून निर्णय घेतला जाणार आहे.  

ओलेक्ट्रा कंपनीला पाच हजार गाड्यांचे टेंडर

एसटीच्या ताफ्यात दोन प्रकारच्या ईव्ही बसगाड्या येत्या काही वर्षात दाखल होणार आहेत. या ताफ्यात 9 मीटर आणि 12 मीटर लांबीच्या दोन गाड्या असणार आहेत. एसटी महामंडळाच्या ताफ्यात ओलेक्ट्रा कंपनीच्या पाच हजार ईव्ही गाड्या असणार आहे. ओलेक्ट्रा कंपनीला पाच हजार गाड्यांचे टेंडर आणि वर्क ऑर्डर देखील मिळालं असल्याची माहिती मिळाली आहे.  ओलेक्ट्रा कंपनीकडून येत्या दोन-तीन महिन्यात एसटी महामंडळाला प्रोटोटाइप डिझाईन दाखवलं जाणार आहे.  एसटी महामंडळाकडून प्रोटोटाइपला हिरवा कंदील दाखवल्यानंतर दोन वर्षाच्या काळात पाच हजार इलेक्ट्रीक बसगाड्या दाखल होणार आहेत. 

दरम्यान, 'जिथे गाव, तिथे एसटी' अशी संकल्पना अनेक वर्षांपूर्वी एसटी महामंडळाने राबवली होती. त्यानुसार आज प्रत्येक गावागावात एसटी सहज बघायला मिळते. पेट्रोल-डिझेलच्या किमतीने उच्चांक गाठल्यामुळे येत्या काळात या इलेक्ट्रिक बसचा सर्वसाधारण नागरिकांना फायदा होणार आहे. शिवाय तिकीटांच्या दरात देखील तफावत जाणवण्याची शक्यता आहे. 

हे ही वाचा :

ST Electric Bus : आरामदायी प्रवासाची हमी, देते एसटीची 'शिवाई'; पाहा फोटो

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

तिकडं देवाभाऊ स्वित्झर्लंडमध्ये पोहोचले, इकडं शिंदेंच्या नगरसेवकांच्या फोनाफोनीची सुद्धा चर्चा, संजय राऊतांच्या त्या दोन वाक्यांनी भाईंच्या पोटात गोळा आणला! हाॅटेलमध्ये सुद्धा पोहोचणार
तिकडं देवाभाऊ स्वित्झर्लंडमध्ये पोहोचले, इकडं शिंदेंच्या नगरसेवकांच्या फोनाफोनीची सुद्धा चर्चा, संजय राऊतांच्या त्या दोन वाक्यांनी भाईंच्या पोटात गोळा आणला! हाॅटेलमध्ये सुद्धा पोहोचणार
BMC Election 2026: मोठी बातमी: शिंदे गटाचे नगरसेवक ठाकरेंच्या संपर्कात, मुंबईच्या राजकारणात उलथापालथ होणार?
मोठी बातमी: शिंदे गटाचे नगरसेवक ठाकरेंच्या संपर्कात, मुंबईच्या राजकारणात उलथापालथ होणार?
Sunil Shelke: सुनील शेळकेंना मोठा धक्का; राष्ट्रवादी उपाध्यक्ष भाजपात, झेडपी-पंचायत समिती निवडणुकांच्या डावपेचांना वेग
सुनील शेळकेंना मोठा धक्का; राष्ट्रवादी उपाध्यक्ष भाजपात, झेडपी-पंचायत समिती निवडणुकांच्या डावपेचांना वेग
Maharashtra Elections Results 2026: एका मतानं मैदान मारलं! परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेचा अवघ्या 1 मताने विजय, तर गडचिरोलीत भाजप उमेदवाराचा धक्कादायक पराभव
एका मतानं मैदान मारलं! परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेचा अवघ्या 1 मताने विजय, तर गडचिरोलीत भाजप उमेदवाराचा धक्कादायक पराभव

व्हिडीओ

Sanjay Raut On Mumbai Mayor : नगरसेवकांना लपवावं लागत असेल तर कायदा-व्यवस्था ढासललीय, एकनाथ शिंदेंना टोला
Girish Mahajan Majha Katta : सुधाकर बडगुजर प्रकरण ते नाशिकचं तपोवन, गिरीश महाजन 'माझा कट्टा'वर
PMC Election : पुण्याची 22 वर्षीय सई थोपटे सर्वात तरुण नगरसेवक Exclusive
BMC 22 years Corporator : BMC वॉर्ड नं 151 मधून 22 वर्षांची तरुणी झाली नगरसेवक! कसा होता प्रवास?
Uttar Pradesh Bijnor च्या मंदिरात कुत्र्याची अखंड प्रदक्षिणा,भटका श्वान की दैवी संकेत?Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तिकडं देवाभाऊ स्वित्झर्लंडमध्ये पोहोचले, इकडं शिंदेंच्या नगरसेवकांच्या फोनाफोनीची सुद्धा चर्चा, संजय राऊतांच्या त्या दोन वाक्यांनी भाईंच्या पोटात गोळा आणला! हाॅटेलमध्ये सुद्धा पोहोचणार
तिकडं देवाभाऊ स्वित्झर्लंडमध्ये पोहोचले, इकडं शिंदेंच्या नगरसेवकांच्या फोनाफोनीची सुद्धा चर्चा, संजय राऊतांच्या त्या दोन वाक्यांनी भाईंच्या पोटात गोळा आणला! हाॅटेलमध्ये सुद्धा पोहोचणार
BMC Election 2026: मोठी बातमी: शिंदे गटाचे नगरसेवक ठाकरेंच्या संपर्कात, मुंबईच्या राजकारणात उलथापालथ होणार?
मोठी बातमी: शिंदे गटाचे नगरसेवक ठाकरेंच्या संपर्कात, मुंबईच्या राजकारणात उलथापालथ होणार?
Sunil Shelke: सुनील शेळकेंना मोठा धक्का; राष्ट्रवादी उपाध्यक्ष भाजपात, झेडपी-पंचायत समिती निवडणुकांच्या डावपेचांना वेग
सुनील शेळकेंना मोठा धक्का; राष्ट्रवादी उपाध्यक्ष भाजपात, झेडपी-पंचायत समिती निवडणुकांच्या डावपेचांना वेग
Maharashtra Elections Results 2026: एका मतानं मैदान मारलं! परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेचा अवघ्या 1 मताने विजय, तर गडचिरोलीत भाजप उमेदवाराचा धक्कादायक पराभव
एका मतानं मैदान मारलं! परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेचा अवघ्या 1 मताने विजय, तर गडचिरोलीत भाजप उमेदवाराचा धक्कादायक पराभव
‘जब एक पति अपनी बायको की सुनता है…’; मीनल पाटील यांच्या विजयानंतर सांगावीतील बॅनर चर्चेत, 'पुष्पा'तील डायलॉगने चर्चा रंगली
‘जब एक पति अपनी बायको की सुनता है…’; मीनल पाटील यांच्या विजयानंतर सांगावीतील बॅनर चर्चेत, 'पुष्पा'तील डायलॉगने चर्चा रंगली
काका पुतण्यांनी एकत्र शड्डू ठोकूनही मनपात निवडणुकीत हाती भोपळा लागला; आता झेडपी, पंचायत समितीला शरद पवार गट तुतारीचा 'गळा' दाबून घड्याळाचे काटे फिरवणार!
काका पुतण्यांनी एकत्र शड्डू ठोकूनही मनपात निवडणुकीत हाती भोपळा लागला; आता झेडपी, पंचायत समितीला शरद पवार गट तुतारीचा 'गळा' दाबून घड्याळाचे काटे फिरवणार!
Abdul Sattar: आमदार अब्दुल सत्तारांना मतदारांवरील 'रामबाण उपाय' महागात पडणार? सत्तार, जिल्हाधिकाऱ्यांसह तीन अधिकाऱ्यांना सिल्लोड न्यायालयाची नोटीस!
आमदार अब्दुल सत्तारांना मतदारांवरील 'रामबाण उपाय' महागात पडणार? सत्तार, जिल्हाधिकाऱ्यांसह तीन अधिकाऱ्यांना सिल्लोड न्यायालयाची नोटीस!
गोकुळचे माजी चेअरमन विश्वास आबाजी पाटील अखेर शिंदे गटात दाखल; गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत भूमिका निर्णायक ठरणार?
गोकुळचे माजी चेअरमन विश्वास आबाजी पाटील अखेर शिंदे गटात दाखल; गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत भूमिका निर्णायक ठरणार?
Embed widget