एक्स्प्लोर

मुंबईत सेवा देऊन परतलेले सांगलीतील 80 हून अधिक एसटी कर्मचारी कोरोना बाधित

कोरोना काळात मुंबईत सेवा देऊन सांगलीत परतलेल्या 80 हून अधिक एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात असून सध्या एसटी प्रशासनाची धाकधूक वाढली आहे.

सांगली : मुंबईहून सेवा बजावून सांगलीत परतलेल्या 9 एसटी डेपोंमधील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. काही दिवसांपूर्वी राज्य शासनानं कोरोना संकटामुळे थांबलेल्या सेवा पूर्ववर्त करण्यासाठी जिल्ह्यांतर्गत एसटी प्रवासाला परवानगी दिली होती. त्यानंतर मुंबईत सेवा बजावून सांगली जिल्ह्यात परतलेल्या एस.टी मधील चालक-वाहकांना कोरोनाची लागण झाली असून हा आकडा 80 वर गेला आहे. आतापर्यंत जिल्ह्यांतील 9 डेपोमधील 80 हून अधिक चालक-वाहक कोरोना बाधित झाल्याचे समोर आले आहे. यामुळे एस.टी प्रशासनाची धाकधूक वाढली आहे.

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे मुंबई लोकल सेवा बंद करण्यात आली. अनलॉक प्रक्रियेत सर्व पूर्ववर्त करण्यासाठी बेस्ट सेवा आणि एसटी सेवा सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली. परंतु, लोकल सेवा बंद असल्यामुळे बेस्ट सेवेवर संपूर्ण ताण पडत होता. त्यामुळे राज्यांतील प्रमुख एसटी बस डेपोमधून काही बसेस या मुंबईकडे रवाना झाल्या होत्या. गेले अनेक दिवस एसटी कर्मचारी मुंबईत सेवा देत होते. सांगली जिल्ह्यातूनही 100 च्या आसपास एसटी बस या मुंबईत दाखल झाल्या होत्या. तसेच जवळपास 400 कर्मचारी हे गेल्या 12 दिवसांपासून मुंबईत सेवा देत होते. या कर्मचाऱ्यांचा सेवेचा कालावधी संपल्यामुळे दोन दिवसांपूर्वी नवीन 400 जणांची टीम मुंबईत दाखल झाली आणि सुरुवातीला सेवा देण्यासाठी हजर झालेले कर्मचारी पुन्हा आपल्या जिल्ह्यांत परतले.

एसटी सेवा देणारे कर्मचारी जिल्ह्यांत परतल्यानंतर त्यांची रॅपीड अॅन्टीजन टेस्ट करण्यात आली. त्यामधील काही कर्मचारी कोरोना बाधित असल्याचं आढळून आलं. सध्या 80 एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं निष्पन्न झालं आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 9 डेपोमधील 80 चालक-वाहक बाधित झाल्याचे समोर आले आहे. तसेच हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात असून सध्या एसटी प्रशासनाची धाकधूक वाढल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, ज्या कर्मचाऱ्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Embed widget