एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोल्हापूरमध्ये एसटी बसची वाहनांना धडक, दोघांचा मृत्यू
कोल्हापूर : कोल्हापूरच्या उमा टॉकीज चौकात एका एसटी बसनं 10 ते 15 गाड्यांना चिरडलं आहे. यात दोघांचा मृत्यू झाला आहे. आज संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली आहे.
कोल्हापूरच्या उमा टॉकीज चौकातून आज संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास एक एसटी बस जात होती. जवळपास 18 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसच्या चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बसनं 10 ते 15 वाहनांना धडक दिली. यात 5 वाहनांचं नुकसान झालं आहे. एकीकडे गाडीचे ब्रेक फेल झाल्यानं चालकाचा ताबा सुटल्याचं बोललं जात आहे, तर दुसरीकडे चालकाला हार्ट अटॅक आल्यानं हा अपघात झाल्याचं अंदाजही वर्तवला जात आहे.
या अपघातात 8 ते 9 प्रवासी जखमी झाले आहेत, सर्व जखमींना छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
निवडणूक
करमणूक
निवडणूक
Advertisement