एक्स्प्लोर
यशस्वी भव! आजपासून दहावीची परीक्षा, पहिला पेपर मराठीचा; विद्यार्थ्यांनो, या सूचना पाळा अन्यथा....
SSC Exam : आजपासून दहावीची लेखी परीक्षा सुरु होणार असून 15.77 लाख विद्यार्थी या परीक्षेसाठी बसणार आहेत.

SSC Exam
SSC Exam : राज्यात आजपासून दहावीची परीक्षा सुरु होत असून सकाळी 11 ते 2 या दरम्यान मराठीचा पेपर घेण्यात येणार आहे. दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 15,77,256 विद्यार्थी परीक्षा देणार असून 533 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. आजपासून सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी माध्यमिक बोर्डाने संपूर्ण तयारी केली आहे.
एकूण विद्यार्थीसंख्येमध्ये 8,44,16 मुले असून 7,30,62 मुली या परीक्षेला बसणार आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत दहावीच्या परीक्षेला यंदा 61 हजार 708 इतके कमी विद्यार्थी बसले आहेत. राज्यात यंदा कॉपीमुक्त अभियान राबवलं जात असून त्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी बोर्डाकडून विशेष काळजी
- प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका वाटल्यानंतर परीक्षा केंद्रावर कुठल्याही विद्यार्थ्यांना प्रवेश नसेल.
- बोर्ड परीक्षा केंद्रावरील शंभर मीटर अंतरावर झेरॉक्स सर्व दुकाने बंद ठेवण्यात येतील.
- प्रत्येक तालुक्यात भरारी पथक ही परीक्षा केंद्रावर जाऊन वेळोवेळी तपासणी करेल.
- परीक्षा केंद्राच्या बाहेर कॉपी पुरवणाऱ्यांचा घोळका असेल तर त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. परिणामी 144 कलम सुद्धा लागू केला जाऊ शकतं.
- परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांची चोरी करणे, प्रश्नपत्रिका मिळविणे, विकणे आणि विकत घेतल्यास किंवा मोबाईल अन्य इलेक्ट्रॉनिक्स माध्यमावर प्रसारित केल्यास परीक्षार्थी विद्यार्थ्याची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- तसेच विद्यार्थ्यास पुढील पाच परीक्षांना प्रतिबंध (Rusticate) करण्यात येणार आहे. शिवाय परीक्षार्थ्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
खालील नियमांचे उल्लंघन केल्यास करण्यात येणार कारवाई
- मंडळाच्या अधिकृत उत्तरपत्रिका, पुरवण्या, आलेख, नकाशे, लॉग टेबल, अनधिकृतपणे मिळवणे आणि वापर केल्यास पुढील एका परीक्षेस प्रतिबंध करण्यात येणार आहे.
- परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांची चोरी करणे, मिळविणे, विकणे व विकत घेणे तसेच भ्रमणध्वनी आणि अन्य इलेक्ट्रॉनिक्स माध्यमावर प्रसारित केली तर पुढील पाच परीक्षांना प्रतिबंध करण्यात येणार आहे.
परीक्षार्थ्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल होणार
- मंडळाने मान्यता न दिलेली अथवा प्रतिबंध केलेली साधने, साहित्य परीक्षा दालनात स्वत:जवळ बाळगणे वापरणे.
- उत्तरपत्रिकेत-पुरवणीत प्रक्षोभक, अर्वाच्च्य भाषेचा वापर, शिवीगाळ लिहिणे किंवा धमक्या देणे, बैठक क्रमांक, फोन नंबर, भ्रमणध्वनी क्रमांक देऊन संपर्क साधण्यास विनंती करणे.
- विषयाशी संबधित नसलेला अन्य मजकूर लिहिणे, परीक्षा सुरू असताना इतर परीक्षार्थ्यांबरोबर उत्तराच्या संदर्भात गैरहेतूने संपर्क साधणे,एकमेकांचे पाहून लिहिणे, अन्य परीक्षार्थ्यांस तोंडी उत्तरे सांगणे.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Advertisement
Advertisement
























