एक्स्प्लोर
सांगलीच्या लालमातीतील 'हानीकारक बापू' आणि उद्याची गीता फोगट
सांगली: सांगली जवळच्या तुंगमधील कुस्तीपटू संजना बागडी आणि तिच्या कुटुंबाच्या संघर्षाची कहाणी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या दंगल सिनेमासारखीच आहे. अतिशय हालाखीच्या परिस्थितीत तिचे आजोबा संजानाला कुस्ती शिकवत असल्याने, महाराष्ट्रातील गीत फोगट सांगलीच्या लाल मातीत तयार होत असल्याचे बोलले जात आहे.
सांगली जिल्ह्यातील तुंगच्या बागडी कुटुंबाला जवळपास 100 वर्षाची कुस्तीची परंपरा लाभलेली आहे. पण हातावर पोट असलेल्या बागडी कुटुंबियांची परंपरागत कुस्तीची ही परंपरा काही काळासाठी खंडीत झाली. मात्र, याच कुटूंबातील एक मुलगी स्वयंस्फूर्तीने कुस्तीकडे वळाल्याने बागडी कुटुंबाची कुस्तीची परंपरा पुन्हा सुरु झाली आहे.
ज्या वयात खेळायचे-बागाडायचे, त्या वयांत आपली कुस्तीची खानदानी परंपरा पुढे नेण्याचा चंग संजना बागडीने बांधला, अन् वडिलांंपाठोपाठ आजोबांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ती कुस्तीचे डावपेच शिकू लागली. परिस्थितीमुळे अकादमीमध्ये कुस्तीचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेणे शक्य नसलेल्या संजनाचे घरच्या आखाड्यात कुस्तीचा सराव सुरु केला.
विशेष म्हणजे, या दरम्यान, जे त्रास आणि टीका गीता फोगट यांच्या वाट्याला आले, त्याच अडचणी संजनाच्या वाट्याला देखील आल्या. डोक्यावरचे केस कापावे लागले, शाळेत मुला-मुलींकडून होणारी टिंगल सहन करावी लागली. पण तरीही संजनाने हार मानली नाही. संजनाच्या कष्टांना तिच्या कुटुंबियांनीही साथ दिली.
आजोबांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संजना अवघ्या दोन वर्षात पट्टीची कुस्तीपटू बनली. सध्या जिल्ह्याबरोबरच राज्यभरातील जत्रामधील मुलींच्या कुस्ती स्पर्धांमध्ये तिचा डंका सर्वदूर वाजतो आहे. मुंबई महापौर केसरीचा देखील तिने मान मिळवला आहे.
संजनाची उत्तम कुस्तीपटू होण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिचे आजोबा-वडील झटत आहेत. संजनाचे हे कुस्तीप्रेम पाहून आज त्यांच्या आखाड्यात अनेक मुली तिच्यासोबत सराव करत कुस्तीचें धडे घेत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement