एक्स्प्लोर
दारुविक्रीसाठी खास जॅकेट, 24 खिशात 24 बाटल्या
यवतमाळ: दारु पिण्यासाठी आणि दारु विकण्यासाठी कोण काय शक्कल लढवेल सांगता येत नाही.
यवतमाळमध्ये एका व्यक्तीनं दारुविक्रीसाठी वेगळीच शक्कल लढवली. शंकर पवार या व्यक्तीने दारु विक्रीसाठी एक खास जॅकेट शिवल्याचं उघड झालं आहे.
या जॅकेटला एक-दोन नव्हे तर तब्बल 24 खिसे त्याने बनवून घेतले. या 24 खिशात 24 दारुच्या बाटल्या लपवल्या होत्या.
मात्र बसस्थानक परिसरात संशयितरित्या फिरणाऱ्या शंकर पवारला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी हा सर्व प्रकार उघड झाला.
या जॅकेटमध्ये दारुच्या बाटल्या भरुन नेत असताना यवतमाळ बसस्थानकात त्याला अटक करण्यात आली.
दारुची अवैध विक्री करण्यासाठी शंकरनं हे जॅकेट शिवलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement