Pune Railway : दिवाळीसाठी वैदर्भीयांचा मार्ग मोकळा; बंद असलेल्या रेल्वे 19 पासून सुरू होणार, दिवाळी विशेष गाडीही सुरु
पुण्यातून विदर्भात जाणाऱ्या रेल्वे 19 ऑक्टोंबरपासून सुरु करण्यात आल्या आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर रेल्वे प्रशासनाने विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा दिला आहे.

Pune Railway : पुण्यातून विदर्भात जाणाऱ्या रेल्वे 19 ऑक्टोबरपासून सुरु (Railway) करण्यात आल्या आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर रेल्वे प्रशासनाने विदर्भात (pune Nagpur) जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा दिला आहे. दौंड ते मनमाड या मार्गाचं दुरुस्तीचं काम सुरु असल्याने 18 ऑक्टोबरपर्यंत या गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अनेक प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली होती. मात्र या मार्गाचं काम पूर्ण झाल्याने या रेल्वे पुन्हा रुळावर येणार आहे. त्यामुळे विदर्भात जाणाऱ्या नागरीकांचा घर गाठण्याचा प्रश्न मिटला आहे.
दिवाळीच्या तयारीसाठी विदर्भातील नागरीक काही महिने आधीच तिकीट काढून ठेवतात. यंदा सगळ्या गाड्यांचं बुकिंग पूर्ण होत आलं होतं. शिवाय अनेकांनी अधिकचे पैसे मोजून तिकीट खरेदी केलं होतं. दिवाळीच्या प्रवासाची सोय करुन ठेवली होती. मात्र गाड्या रद्द झाल्याने त्यांच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहिला होता. मात्र रेल्वे सुरु झाल्याने नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या गाड्या पुन्हा सुरु
-अजनी एक्स्प्रेस (Ajni Express)
-पुणे-नागपूर हमसफर (pune - nagpur Hamsafar express)
-पुणे-नागपूर गरीबरथ (Pune- nagpur garibrath)
-अमरावती एसी एक्स्प्रेस
नागपूर-अजनी विशेष ट्रेन
विदर्भात जाण्याऱ्या सर्वा गाड्यांचे बुकिंग फुल झाले आहेत. त्यामुळे रेल्वेकडून पुणे-अजनी ही दिवाळी स्पेशल गाडी सुरु करण्यात आली आहे. 18 ऑक्टोंबर ते 29 नोव्हेंबरपर्यंत ही गाडी सुरु असणार आहे. प्रवाशांची मागणी लक्षात घेत ही विशेष रेल्वे सुरु करण्यात आली आहे. प्रत्येक मंगळवारी ही गाडी पुण्यातून सुटणार आहे आणि नागपूरला जाणाऱ्या बाकी गाड्यांना देखील अतिरिक्त कोच लावण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली आहे.
ट्रॅव्हल्सची तिकीटं आवाक्याबाहेर
नागपूर आणि अमरावतीहून पुण्यात येणाऱ्या गाड्याही धावणार नसल्याचे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. या गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांना रेल्वेने नागपुरात जाण्यासाठीचा मार्ग बंद झाला होता. एवढ्या कमी काळात आता विदर्भात जाण्यासाठी दुसरा मार्ग मिळणं अवघड होतं त्यामुळे दिवाळीला घर कसं गाठायचं हा प्रश्न निर्माण झाला होता. दरवर्षी दिवाळी आली की ट्रॅव्हल्सची तिकीटं वाढवण्यात येतात. एरवी 1200 रुपये असलेलं तिकीट दिवाळीच्या काळात 4000 रुपये असतं. मात्र या गाड्या सुरु केल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे. मात्र बुकिंग फुल झालं तर अनेकांना महाग तिकीटं काढून घर गाठावं लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
