एक्स्प्लोर

मुख्यमंत्रीसाहेब, माझ्या आईला शोधून द्या, ओमची आर्त हाक...

अरुणाचल प्रदेश येथे कार्यरत असलेल्या जवानाची पत्नी 22 दिवसांपासून एक वर्षाच्या मुलीसह गायब आहे. तिचं नक्षलवाद्यांनी अपहरण केलं असावं किंवा मानवी तस्करीची ती बळी पडली असावी, असा नातलगांना संशय आहे.

परभणी : चीनच्या सीमेनजिक देशाचं संरक्षण करण्यासाठी तैनात एका जवानाची पत्नी 22 दिवसांपासून एक वर्षाच्या मुलीसह गायब आहे. तिचं नक्षलवाद्यांनी अपहरण केलं असावं किंवा मानवी तस्करीची ती बळी पडली असावी, असा नातलगांना संशय आहे. उगवत्या सुर्याच्या प्रदेशात, अरूणाचलात मराठी जवानाच्या बाबतीत ही घटना घडली. दुर्दैव असं की देशभक्तीचे मोठ मोठी भाषण देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून देशाच्या संरक्षण मंत्र्यांपर्यंत एकानेही या जवानाची फिर्याद ऐकली नाही. 22 दिवस हिमालयाच्या दऱ्या खोऱ्यात आपल्या आठ वर्षाच्या मुलाला पाठीवर घेऊन या जवानाने बायकोचा शोध घेतला. पण यश मिळालं नाही. या घटनेची माहिती मिळताच एबीपी माझाने पाठपुरावा सुरु केला. नक्षलग्रस्त भागातून स्वप्नाचं अपहरण? ओमची आई 22 दिवसांपूर्वी बाबाशी कुरबूर झाली म्हणून घराबाहेर पडली. सोबत एक वर्षाची आरा होती. तेव्हापासून आई कुठे गेली, असा प्रश्न सारखा ओमला सतावतोय. चिमुरड्याचे डोळे रडून लाल झाले आहेत. ओमचे वडील अनिल अरुणाचल प्रदेशच्या टेंगा इथे भारतीय सैन्यात आर्टिलरी विभागात नायक आहेत. जवळच चीनची सीमा आहे. छोट्या-मोठ्या कारणावरून अनिलचा बायको स्वप्नाशी खटका उडाला. त्यानंतर दीड तासांनी घराबाहेर पडलेल्या स्वप्नाचा आजपर्यंत पत्ता लागला नाही. ओमला पाठीवर घेऊन अनिलने गावं पालथी घातली आहेत. अनिल ज्या टेंगा भागात तैनात आहेत, तिथून आसामच्या तेजपूरपर्यंतचा भाग नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो. खंडणीसाठी अपहरणाच्या घटना इथं घडतात. मानवी तस्करांचं मोठं जाळं या भागात आहे. स्थानिक पोलिसांकडून सहकार्य नाही अनिलच्या माहितीवर रेजिमेंटने पोलिसांत तक्रार नोंदवली. 400 जणांच्या फौजेने गुवाहटीपर्यंत शोध घेतला. हिमालयातल्या वाहत येणाऱ्या नदीपात्रात पैसे देऊन मच्छीमार उतरवले. पण अरूणाचलच्या स्थानिक पोलिसांनी मदतीचा हात दिला नाही. अनिलचे बंधू आणि मेहुण्यानेही महाराष्ट्रातून जाऊन अरूणाचलात शोध घेतला पण तोही व्यर्थ ठरला. सध्या देशात देशप्रेमाचे गोडव गाणार मोदी सरकार आहे..फडणविसही देशप्रेमाची उदाहारणे देतात...पण चीनच्या सीमेलगत मराठी जवानाच्या बायकोच्या गायब होण्याची देवेंद्र फडणवीस, रणजित पाटील, हसंराज अहिर, निर्मला सीतारमण, किरण रिजूजी, नितीन गडकरी, अरूणाचलचे मुख्यमंत्री..कोणी कोणी दखल घेतलेली नाही. सीसीटीव्ही फुटेज, हीच ओमची शेवटची आठवण स्वप्ना गायब झाल्या त्याच्या दुसऱ्या दिवशीचं मिलीटरी चेक पोष्टवरचं एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळालंय. मिलीटरीने स्वप्ना आणि मुलीचे बॅनर तयार करून जागोजागी लावले आहेत. ओमसाठी सीसीटीव्हीतली आई हीच शेवठची आठवण उरली आहे. स्वप्नाचे सासू-सासरे, आई-वडील डोळ्यात पाणी आणून आठवणीने दिवसरात्र रडत आहेत. एक महिन्याच्या सुट्टीवर आलेल्या अनिललाही वेड लागण्याची वेळ आली आहे. बायको आणि मुलीच्या आठवणीने शत्रूला चारीमुंड्या चित करण्याची छाती ठेवणारा हा जवान हतबल झाला आहे. पाहा बातमीचा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget