एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
11 दिवसांपासून सोलापूरची परिवहन सेवा ठप्प, कामबंद आंदोलनाची दखल न घेतल्याने शोले स्टाईल आंदोलन
चौदा महिन्यांच्या थकित पगारासाठी महापालिका परिवहन कामगारांनी प्रहार कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु केलं आहे. गेल्या 11 दिवसांपासून हे आंदोलन सुरु होतं. त्यामुळे आठवडभरापासून सोलापूरमधील परिवहन सेवा ठप्प झाली आहे.
सोलापूर : सोलापूरमधील परिवहन कर्मचाऱ्यांच्या गेल्या 11 दिवसांपासून सुरु असलेल्या कामबंद आंदोलनाला आक्रमक रुप आले आहे. गेल्या 11 दिवसांपासून सुरू काम बंद आंदोलनाची दखल न घेतल्याने परिवहन कर्मचाऱ्यांनी शोले स्टाईल आंदोलन सुरू केलं आहे.
चौदा महिन्यांच्या थकित पगारासाठी महापालिका परिवहन कामगारांनी प्रहार कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु केलं आहे. गेल्या 11 दिवसांपासून हे आंदोलन सुरु होतं. त्यामुळे आठवडभरापासून सोलापूरमधील परिवहन सेवा ठप्प झाली आहे.
याआधीही थकीत पगाराच्या मागणीसाठी भीक मांगो आंदोलन करण्यात आलं होतं. पोस्टरबाजी करण्यात आली होती. मात्र या आंदोलनांची दखल घेण्यात आली नाही. महापालिका परिवहन कर्मचाऱ्यांचे जुलै 2017 ते मे 2018 आणि मार्च 2019 ते जून 2019 पर्यंतचे वेतन परिवहन विभागाकडे प्रलंबित आहे.
महापालिकेपासून राज्यात भाजप सत्ताधारी आहे. सोलापुरात भाजपचे दोन मंत्री आहेत. असे असून देखील परिवहन कर्मचाऱ्यांवर पगार नसल्याने कर्जबाजारीपणाला सामोरे जावे लागत आहे. जर लवकर यावर तोडगा निघाला नाही तर आषाढीची शासकीय पूजा मुख्यमंत्र्याना करु देणार नाही, असा इशाराही प्रहार संघटनेतर्फे देण्यात आला आहे.
दरम्यान सोमवारी सकाळी 6 वाजता जुळे सोलापुरातील पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन सुरू केलं आहे. तीन तास उलटले तरी कोणतेही अधिकारी, पोलीस या ठिकाणी दाखल झाले नाहीत. त्यामुळे परिवहन कर्मचाऱ्यांची आवाज ऐकून कोणी यांची दखल घेणार का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement