एक्स्प्लोर
Advertisement
सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्ताराला विरोध करणाऱ्या याचिकेवर गुरुवारी हायकोर्टात सुनावणी
सोलापूरातील विद्यापीठाचा आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला. परंतु काही लोकांचा या नामविस्ताराला विरोध आहे. त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
मुंबई : सोलापूरातील विद्यापीठाचा आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला. परंतु काही लोकांचा या नामविस्ताराला विरोध आहे. त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे गुरूवारी सुनावणी होणार आहे.
सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्ताराला विरोध करत शिवा संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. संघटनेने या याचिकेवर बुधवारी (आज) सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणी केली होती. परंतु उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने त्यास नकार दिला. मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे बुधवारी होणार होती.
दरम्यान, सोलापूर विद्यापीठाच्या नावाबाबत परिस्थिती 'जैसे थे' ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असे असतानादेखील नामविस्ताराचा घाट घालणाऱ्यांविरोधात कोर्टाचा अवमान केल्याबद्दल कारवाईची मागणीदेखील याचिकाकर्त्यांकडून करण्यात आली आहे.
वाचा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, नामविस्तार कार्यक्रमात धनगर कार्यकर्त्यांच्या गोंधळ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
पुणे
भविष्य
राजकारण
Advertisement