एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

उजनीचे पाणी पुन्हा पेटणार, इंदापूरला 5 टीएमसी पाणी देण्याच्या आदेशानंतर वातावरण तापले, पालकमंत्री भरणे म्हणाले... 

सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणावर तसे राजकारण नेहमीच चालत आलं आहे. मात्र या पाण्याबाबत जिल्ह्यातील जनता फारच आक्रमक असल्याने आता पुन्हा एका शासकीय आदेशाने जिल्ह्यात पुन्हा पाणी तापू लागले आहे.

पंढरपूर : कायम दुष्काळी असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणावर तसे राजकारण नेहमीच चालत आलं आहे. मात्र या पाण्याबाबत जिल्ह्यातील जनता फारच आक्रमक असल्याने आता पुन्हा एका शासकीय आदेशाने जिल्ह्यात पुन्हा पाणी तापू लागले आहे. एका बाजूला कोरोनाचे जीवघेणे संकट आ वासून उभे असताना जलसंपदा विभागाने काढलेल्या एका आदेशाने इंदापूर तालुक्यातील 22 गावांना दिलासा मिळणार असला तरी संपूर्ण सोलापूर जिल्हा यात होरपळून निघणार आहे. 

उजनी धरणाच्या ऊर्ध्व बाजूस बिगर सिंचन पाणी वापरातून उपलब्ध होणारे सांडपाणी उजनी जलाशयातून उचलून शेटफळगढे येथे नवनी मुठा उजवा कालव्यात किमी 169 येथे सोडून खडकवासला प्रकल्पाचे सिंचन स्थिरीकरण करण्याबाबत जलसंपदा विभागाने काढलेल्या पत्राने सध्या सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. उजनी धरणातून 5 टीएमसी पाणी इंदापूरला जाणार यावरून सर्वच पक्षातील नेत्यांनी आपल्या टीकेचा रोख बारामतीकडे केला आहे. 

उजनी धरणातील पाण्यावर तसा बऱ्याच मंडळींनी डोळा ठेवल्याने मूळ उजनी धरणाच्या उभारणीतून विस्थापित झालेल्या विस्थापितांवर अन्याय झाल्याची भावना येथील धरणग्रस्त बोलून दाखवत आहेत. तर पालकमंत्र्यांनी पंढरपूर प्रचारात मंगळवेढ्याच्या दुष्काळी 35 गावांचा पाणी प्रश्न सोडवायचे आश्वासन दिल्याची आठवण भाजप उमेदवार समाधान अवताडे यांनी करून दिली आहे. 

हा निर्णय जाहीर होताच करमाळा तालुक्यात सर्वात जास्त उद्रेक व्यक्त होऊ लागला असून या तालुक्यातील अनेक गावेच्या गावे धरण उभारणीत विस्थापित झाली असल्याने केत्तूर येथे शेतकरी नेते अतुल खूपसे यांनी तर थेट पालकमंत्र्यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढत त्याला उजनी जलाशयात जलसमाधी दिली. वास्तविक अजून उजनी धरणातून मराठवाड्याला द्यायचे 21 टीएमसी पाणीही दिले गेले नाही ना सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी असलेल्या अक्कलकोट , सांगोला , मंगळवेढा , दक्षिण सोलापूर , करमाळा व माढा या भागातील योजना पूर्ण झाल्या आहेत. 

अशा स्थितीत सध्या उजनी जलाशयात असणाऱ्या पाण्याचे 100 टक्के वाटप यापूर्वी झाले असताना हे पाणी कुठून उपलब्ध करणार असा सवाल शिवसेना आमदार शहाजी पाटील आणि भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी केला आहे. सोलापूर जिल्ह्याचे एक थेंबही पाणी नेऊ देणार नाही असा पवित्र करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील आणि दिग्विजय बगल यांनी घेतली आहे. या प्रश्नावर आता जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षाच्या आमदार खासदार यांनी एकत्र येत याला विरोध करावा अशी मागणी आमदार प्रशांत परिचारक यांनी केली आहे.

दरम्यान सर्व जिल्हा अंगावर येऊ लागल्याचे लक्षात येताच पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपण सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचे थेंबभरही पाणी इंदापूरला नेणार नाही आणि तसे झाले तर राजकीय सन्यास घेऊ अशी भूमिका घेतली आहे. मात्र असे असेल तर कोरोनाचे एवढे मोठे संकट सुरु असताना हा आदेश निघालाच कसा याचे उत्तर मात्र त्यांचेकडे नाही. उजनीच्या एकूण पाण्यामध्ये हे पाणीही धरूनच हिशोब झालेला असेल तर 5 टीएमसी पाणी शिल्लक राहणार याचे उत्तर जनतेसमोर येणे गरजेचे असल्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. 

सुरुवातीला बारमाही असलेले उजनी धरणानंतर आठमाही झाले आणि आता तर याचा जास्तीतजास्त वापर पिण्याच्या पाण्यासाठी होत आहे. उन्हाळ्यात जिल्ह्यात सुरु असलेले शेकडो टँकर केवळ उजनीवर अवलंबून असतात. अशात जर हे 5 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय झाला तर आधीच तहानलेल्या सोलापूर जिल्ह्याचा घसा कायम तहानलेला राहणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Congress : सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
Maharashtra vidhan sabha election results: महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
Maharashtra Election Results 2024 : महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 : नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024Maharashtra Election Result 2024 :निवडणुकीत कोणते मुद्दे चर्चेत राहिले?Uday Tanpathakयांचं विश्लेषणMaharashtra Election Result 2024:सत्तेचा मार्ग विदर्भातून?जनता ठरवणार खरी शिवसेना, राष्ट्रवादी कोणतीMaharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
Maharashtra vidhan sabha election results: महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
Maharashtra Election Results 2024 : महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 : नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
Shivsena Thackeray Vs Shinde Camp: एकनाथ शिंदेचे सुरतला नेलेले 40 आमदार तरी निवडून येणार का? उद्धव ठाकरेंना मोठं यश
एकनाथ शिंदेचे सुरतला नेलेले 40 आमदार तरी निवडून येणार का? उद्धव ठाकरेंना मोठं यश
Mumbai Vidhan Sabha Result 2024: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? महायुती आघाडीवर, मविआ टेन्शनमध्ये
मोठी बातमी: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? भाजप-शिंदे गटाची मोठी आघाडी, मविआ टेन्शनमध्ये
Amit Thackeray: अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार
अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार
Maharashtra Election Result :  महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
Embed widget