एक्स्प्लोर

Solapur : भिमानगरमध्ये ट्रक- टँकरचा भीषण अपघात; पाच ठार, सहा जखमी

Solapur Accident News : सोलापूर-पुणे महामार्गावर भिमानगर येथे ट्रक आणि मळी वाहक टँकरचा भीषण अपघात झालाय.

Solapur Accident News : सोलापूर-पुणे महामार्गावर भिमानगर येथे ट्रक आणि मळी वाहक टँकरचा भीषण अपघात झालाय. या भीषण अपघात पाच जणांचा मृत्यू झाला . तर सहा जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. सोलापूरच्या दिशेने निघालेला मळीचा टँकरच्या चालकांचा ताबा सुटला. त्यामुळे टँकर दुभाजकावरुन समोर उभारलेल्या ट्रकवर जाऊन आदळला. यामध्ये चालकांचा आणि ट्रकमध्ये बसलेल्या इतर व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर सहा व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमीवर पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.   

मिळालेल्या माहितीनुसार, माढा तालुक्यात भीमानगर येथील पुलाजवळ शनिवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. मळीचा टँकर आणि तांदळाच्या ट्रक यांच्यामध्ये हा अपघात झालाय. टँकर चालकाचा ताबा सुटल्यानं हा अपघात झालाय. या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झालाय. सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. दोन वाहनांची धडक झाली तेव्हा मोठा आवाज झाला. या आवाजाने परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा त्यांना अपघात घडल्याची माहिती समजली. स्थानिकांनी तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरु केले. तसेच पोलिसांनी तात्काळ कळवले. इंदापूर येथील उप जिल्हा रुग्णालयात जखमीवर उपचार सुरु आहेत. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

उपस्थितांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर-पुणे महामार्गावरुन मळीने भरलेला टँकर प्रवास करत होता. दुसऱ्या बाजूला तांदळाने भरलेला एक ट्रक सोलापूरहून पुण्याच्या दिशेने निघाला होता. याचवेळी भीमानगर येथे आल्यावर टँकर चालकाचा ताबा सुटला. टँकर दुभाजकला धडकला त्यानंतर तो तांदळाच्या ट्रकवर येऊन आदळला. त्यामुळे हा अपघात घडला. यामध्ये पाच जणांना जागीच मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले आहेत.  

सध्या एसटीचा संप सुरु असल्याने प्रवासी मिळेल त्या वाहनाने प्रवास करत आहेत. यातच राष्ट्रीय महामार्गावर कामे सुरु असताना याबाबत कोणतेही सुरक्षिततेचे उपाय योजले जात नसल्याने या प्रवाशांचा बळी गेला आहे . मृतांमध्ये किसान रामलू राठोड-  पुणे, शिवाजी पवार ट्रक चालक उमरगा, व्यंकट दंडगुजे उमरगा, संजय कवडे टँकर चालक श्रीपूर  आणि एका ३० वर्षाच्या पुरुषाचा समावेश आहे  ट्रकमधील दत्ता घंटे लोहार , वेंकटसिंह राजपूत  उमरगा , सुलोचना गुड्डूसिंह राजपूत ही वृद्ध आणि  गौरी दत्त राजपूत या महिलेसह मीनल दत्त राजपूत व धीरज दत्त राजपूत ही दोन लहान मुलेही गंभीर जखमी झाली आहेत. याप्रकरणी ट्रकचा चालक, टॅंकरचा चालक, रस्ते ठेकेदार आणि रास्ता मेंटेनन्स ठेकेदाराच्या विरोधात टेम्भूर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 

मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live

महत्त्वाच्या बातम्या

Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Pune Crime News: 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Embed widget