Dhananjay Mahadik : राजन पाटील म्हणाले पाटलांच्या पोरांना लग्नाआधीच पोरं, महाडीक म्हणतात सासुरवाडीच्यांना विचारा काय वाटत असेल...
मोहोळचे राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांनी केलेल्या टिकेला खासदार धनंजय महाडिकांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Dhananjay Mahadik on Rajan Patil : भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या (Bhima Co-operative Sugar Factory Election) निमित्तानं राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपचे खासदार धनंजय महाडीक (Dhananjay Mahadik) यांच्याविरुद्ध मोहोळचे राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. राजन पाटील यांनी केलेल्या टिकेला धनंजय महाडिकांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राजन पाटील तुमच्या वक्तव्याचं तुमच्या मुला मुलींच्या सासुरवाडीच्या पाहुण्यांना काय वाटते असेल, असा मार्मिक टोला महाडिकांनी लागवलाय. पाटलांच्या पोरांना लग्नाच्या आधीच तुझ्याएवढी बाळं असल्याचे राजन पाटील म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आता महाडिकांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले होते राजन पाटील?
भीमा कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं आयोजीत केलेल्या प्रचारसभेत धनंजय महाडिक यांच्यावर टीका करताना राजन पाटील यांची जीभ घसरली होती. 'आमच्या पोरांना बाळ म्हणतोय, अरे आम्ही पाटील आहोत, पाटलांच्या पोरांना लग्नाच्या आधीच तुझ्याएवढी एवढी बाळं असतात असे सांगत त्याचा आम्हाला स्वाभिमान असल्याचे राजन पाटील म्हणाले होते. तसेच आमच्या पोरांना वयाच्या 17 व्या वर्षीच 302, 307 ची कलमं लागली आहेत, याचा आम्हाला अभिमान असल्याचे म्हणत राजन पाटील यांनी एक प्रकारे मुलांच्या गुन्हेगारीचं समर्थन केलं आहे.
राजन पाटलांचे वक्तव्य महिलांचा अपमान करणारं
राजन पाटील यांचे वक्तव्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यातील समस्त महिला आणि पाटील मंडळींचा अवमान करणारे असल्याचे महाडीक म्हणाले. त्यांच्या वक्तव्याचा पहिल्यांदा राज्यातील पाटलांनी निषेध करायला हवा असंही त्यांनी सांगितलं. राजन पाटील यांच्या वक्तव्याचे त्यांच्या मुला मुलींच्या सासुरवाडीच्या पाहुण्यांना काय वाटत असेल असे महाडीक म्हणाले. तुमच्या या वक्तव्यामुळं मुली दिलेल्या बापाला झोप लागली असेल का? सुनांना काय वाटले असेल? असा सवाल महाडिकांनी केला.
उमेश पाटलांनीही केली होती टीका
राजन पाटलांचं वक्तव्य हे महिलांचं अपमान करणारं आहे. स्वत:च्या पोरांना लग्नाअधीच पोरं झाली आहेत, असं सांगणारा असंस्कृत विकृत माणूस भीमा कारखान्याचा नेता म्हणून तुम्हाला चालणार आहे का? असे म्हणत उमेश पाटील यांनी राजन पाटलांचा समाचार घेतला. राजन पाटील यांच्यावर टीका करताना उमेश पाटील यांनी देखील आक्षेपार्ह टिपण्णी केली आहे. राजन पाटील यांच्यासारखा घाणरेडा नेता मोहोळ तालुक्याचा तीन वेळा आमदार झाला. याची आम्हाला लाज वाटत असल्याचे उमेश पाटील म्हणाले. पाटील म्हणून घ्यायची लाज वाटेल असेही उमेश पाटील म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या:
Rajan Patil : पाटलांच्या पोरांना लग्नाआधीच पोरं होतात याचा अभिमान, राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचं वक्तव्य, गुन्ह्याचंही समर्थन
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
