एक्स्प्लोर

सोलापूर महानगरपालिकेवर भाजपचाच झेंडा; महाविकासआघाडीचा प्रयोग फसला

सोलापूर महानगरपालिकेत महाविकास आघाडीचा प्रयोग फसला असून भाजपाने महापौरपद राखलं आहे. भाजपाच्या श्रीकांचना यन्नम यांनी महापौरपदाची निवडणूक जिंकली आहे.

सोलापूर : महानगरपालिकेच्या निवणूकीच भाजप विजयी झाला असून महापौर आणि उपमहापौरपदी भाजपचेच नगरसेवक विराजमान झाले आहेत. सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या श्रीकांचना यन्नम यांची निवड असून त्यांना 51 मतं पडली आहेत, तर एमआयएमच्या शेख यांना 8 मतं पडली आहेत. या निवडणूकीत काँग्रेस, शिवसेना, बसपा, माकप यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. तर बसपा आणि शिवसेनेच्या प्रत्येकी एक नगरसेवकाने भाजपला पाठिंबा दिला होता. तसेच या निवडणूकीत महाविकासआघाडीला संख्याबळ जमवण्यात अपयश आलं आहे. पाहा व्हिडीओ : भाजपच्या श्रीकांचना यन्नम यांची सोलापूरच्या महापौरपदी वर्णी सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज (बुधवारी) निवडणूक घेण्यात आली. महापौरपदासाठी चार सदस्यांनी अर्ज दाखल केले होते. भाजपकडून श्रीकांचना यन्नम तर महाविकासआघाडीने शिवसेनेच्या सारिका पिसे यांची उमेदवारी निश्चित केली होती. तर एमआयएमने शाहजिदाबानो शेख आणि काँग्रेसने फिरदोस पटेल यांना उमेदवारी दिली होती. सोलापूर महानगरपालिकेत एकूण 102 सदस्य आहेत. त्यातील 49 सदस्य भाजपचे आहेत. त्यानंतर शिवसेना २१, काँग्रेस 14, एमआयएम 9, राष्ट्रवादी 4 वंचित बहुजन आघाडी 3, बसपा 1, माकप 1 असे पक्षांचे बलाबल आहे. उपमहापौर पदासाठी एकूण 9 उमेदवारांचे 13 अर्ज दाखल करण्यात आले होते. या पदासाठी भाजप आणि महाशिवाआघाडीत थेट लढत होती. भाजपकडून राजेश काळे तर महाशिवआघाडीकडून काँग्रेसच्या फिरदोस पटेल यांच्यामध्ये थेट लढत होती. यामध्ये भाजपचे राजेश काळे यांचा विजय झाला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर महानगरपालिकेत महाविकासआघाडीचाच महापौर विराजमान होईल असा दावा केला होता. मात्र निवडणूकीत भाजपाने बाजी मारल्याने महाविकासआघाडीचा प्रयोग फसल्याचं चित्र दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
Sanjay Raut on Girish Mahajan: गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; 108 बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; 108 बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Embed widget