एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एक लाखाला 2 टक्के व्याज, 3 हजार लोकांना गंडा, गुंतवणूकदार हवालदिल
सोलापूर : सोलापुरात गुंतवणूकदारांना कोट्यावधीचा गंडा घालणाऱ्या दांपत्याला पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. एका लाखाला दोन टक्के व्याजानं परतावा देण्याचं आमीष दाखवत जवळपास तीन हजार लोकांना या दाम्पत्यानं फसवलं गेलं आहे.
गुंतवणूकदार हवालदिल!
शेखर आणि सुकेशनी काटगावकर हे दोघेही गेल्या 10 वर्षांपासून शहरात फायनान्स चालवायचे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून फायनान्स कार्यालयाला टाळं लागल्याचं पाहून गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.
विश्वासार्हता... गुंतवणुकीत वाढ... आणि फसवणूक!
फसवणूक करणारं दाम्पत्य प्रत्येक महिन्याला गुंतवणूकदारांना बोलावून व्याजाची रक्कम देत असत. फायनान्सची ही लोकप्रियता झपाट्याने वाढली. गुंतवणूकदारांची संख्याही दिवसागणिक वाढत गेली. दरमहा प्रामाणिकपणे व्याज मिळतं, अशी विश्वासार्हता निर्माण झाली. त्यामुळेच शहरातील श्रामिकांपासून श्रीमंतापर्यंत सगळ्यांनीच रकमा गुंतवल्या. शेवटी व्हायचं तेच झालं... व्याज मिळण बंद झाल्याने लोकांनी मुद्दल परत मिळवण्याचा आग्रह धरला होता. रोज उठून गुंतवणूकदार फायनान्सला जमायचे.
आतापर्यंत 750 लोकांकडून पोलीस तक्रार, कार्यलयाची तोडफोड
फसवणूक झाली तरी पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी कोणीच पुढे येत नव्हता. आपली रक्कम परत मिळावी यासाठी फायनान्समध्ये मोठी गर्दी होऊ लागली. काहींनी तर कार्यालयाची तोडफोड सुद्धा केली. सोलापूर गुन्हे शाखेच्या सहायक आयुक्त शर्मिष्ठा घारगे यांनी गुंतवणूकदारांची बैठक घेऊन तपासाची हमी दिली. त्यानंतर एकापाठोपाठ तक्रारी दाखल होऊ लागल्या. आत्तापर्यंत तब्बल साडेसातशे लोकांनी फसवणूक झाल्याची तक्रार नोंदवली आहे. फायनान्स चालवणाऱ्या शेखर आणि सुकेशनी काटगावकर यांना गुन्हे शाखेने जेरबंद केलंय.
फायनान्स कंपनीत जवळपास 3 हजार सभासद
हरिओम फायनान्स, रुद्र फायनान्स, रिद्धी-सिद्धी फायनान्स आणि कमर्शियल फायनान्स अशा चार फायनान्स कंपन्या काटगावकर दांपत्य चालवत होत. या फायनान्स कंपनीचे जवळपास तीन हजार सभासद आहेत. त्यातील साडेसातशे सभासदांनी फसवणूक झाल्याची फिर्याद जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. सध्या पोलीस कोठडीत असलेल्या फायनान्स चालकाची कासू चौकशी केली जात आहे.
गुंतवणूकदारांना पैसे परत मिळणार?
गुंतवणूक करुन फसलेल्या लोकांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर, पोलिसांनी कारवाई करत काटगावकर दांपत्याला अटक केली. मात्र, आता काटगावकरला अटक झाल्याने गुंतवणूकदारांचा जीव टांगणीला लागला आहे. फसवणुकीची रक्कम कोट्यावधींच्या घरात जात असल्यानं गुंतवणूकदारांचे पैसे मिळवून देण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर निर्माण झालं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
निवडणूक
करमणूक
निवडणूक
Advertisement