एक्स्प्लोर
खोदकामात आढळलेल्या मूर्तीवर साप आणून ठेवला?
मूर्ती सापडल्याचा जो व्हिडीओ सर्वांना दाखवण्यात आला, त्याच्यापूर्वीचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे.
बीड : रस्त्याचं खोदकाम करताना मूर्ती सापडली, तिच्यासोबत साप होता आणि हा चमत्कार असल्याचं समजून ते पाहण्यासाठी बघ्यांनी एकच गर्दी केली. बीड जिल्ह्यातील कन्हेरवाडीतील घटनेची दुसरी बाजू समोर आली आहे.
मूर्ती सापडल्याचा जो व्हिडीओ सर्वांना दाखवण्यात आला, त्याच्यापूर्वीचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे.
गावकरी या सापाला हुसकावण्याचा प्रयत्न करतात आणि हुसकावलेल्या सापाला एका काठीने उचलून मूर्तीवर ठेवलं जातं. त्यामुळे आता प्रश्न उपस्थित होतो, की हा साप मूर्तीसोबत बाहेर निघाला, की साप आणि मूर्तीला एकत्रीतपणे ठेवण्यात आलं.
गावकरी मात्र आपल्या मतावर ठाम आहेत. हा साप मूर्तीजवळून जात नव्हता, त्या परिसरात घुटमळत होता आणि सुरुवातीला तर त्याला मारण्यासाठी काही लोकांनाही बोलावण्यात आलं होतं. मात्र ज्यावेळी तो तिथून जात नव्हता म्हणून काठीने मग त्याला त्याच मूर्तीजवळ ठेवलं, असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.
परळी-अंबाजोगाई रस्त्यावर कन्हेरवाडी गावाजवळील जलालपूर शिवारात जेसीबी मशिनने खाणीचं खोदकाम सुरु होतं. त्या ठिकाणी अचानक एक प्राचीन देवतेची मूर्ती सापडली आणि त्या मूर्तीजवळ नाग बसून होता, असा दावा करण्यात आला. वाऱ्याच्या वेगाने ही बातमी परिसरात पसरली आणि बघ्यांनीही गर्दी केली.
VIDEO : बीड : मूर्तीजवळ आढळलेल्या सापाचा नवा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement