एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 30 एप्रिल 2019 | मंगळवार | एबीपी माझा
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
1. लोकसभेसाठी महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्यात सरासरी 57 टक्के मतदान, चारही टप्प्यात सरासरी 60.68 टक्के मतदानाची नोंद, राजकीय चित्र पलटणार की नाही, यावर जोरदार चर्चा
2. मतदानाच्या टक्केवारीत ग्रामीण महाराष्ट्राची सरशी, चारही टप्प्यात गडचिरोली अव्वल, तर कल्याणचा शेवटून पहिला नंबर, मुंबईतलं मतदान मात्र चार टक्क्यांनी वाढलं
3. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंसह राजकीय दिग्गज मतदानासाठी रांगेत, बॉलिवूडसह मराठी कलाकारांनीही बजावला मतदानाचा हक्क
4. तृणमूलचे 40 आमदार भाजपच्या संपर्कात, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पश्चिम बंगालमधील सभेत दावा, ममता बॅनर्जींनी जनतेचा विश्वासघात केल्याचीही टीका
5. भाजपच्या तिकीटावर लढणारा अभिनेता सनी देओलचा गुरुदासपूरमधून उमेदवारी अर्ज, तर बीएसएफचा बडतर्फ जवान तेज बहादूर यादव सपाच्या तिकीटावर वाराणसीतून थेट मोदींना आव्हान देणार
6. महाराष्ट्राची लाहीलाही, विदर्भात पारा 45 अंशांच्या पार, वर्ध्यात उष्माघाताच्या रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयात 'कोल्ड रुम'ची सुविधा
7. दंतकथेतील हिममानवाच्या अस्तित्वाची चाहूल, मकालू बेस कॅम्पजवळ महाकाय पावलांचे ठसे आढळले, फोटो ट्वीट करुन भारतीय सैन्याचा दावा
8. आयसिसचा म्होरक्या अबू बकर अल बगदादी जिवंत, पाच वर्षांनंतर व्हिडिओ जारी, श्रीलंका हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली
9. होय! आमच्या देशात दहशतवादी आणि जिहादी संघटना आहेत, पाकिस्तानी लष्कराची निर्लज्जपणे कबुली
10. सनरायझर्स हैदराबादचा पंजाबवर 45 धावांनी दणदणीत विजय, डेव्हिड वॉर्नरच्या धडाकेबाज 81 धावा, यंदाच्या आयपीएलमध्ये वॉर्नरचा अखेरचा सामना
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement